Advertisement

देवाला देवपण देणाऱ्या विजय खातूंचे निधन


देवाला देवपण देणाऱ्या विजय खातूंचे निधन
SHARES

गणेशाची मूर्ती घडवणारे दादरमधील प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू (63) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी सकाळी निधन झाले.  दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

परळ वर्कशॉपजवळ त्यांचा गणपती मूर्ती घडवण्याचा कारखाना आहे. गणेशोत्सव जवळ येत असल्याने त्यांच्या या कारखान्यात गणेशमूर्ती घडवण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते. त्याचवेळी दुर्दैवाने त्यांनी जगाचा निरोप घेतला.

गणेशोत्सवात लालबाग आणि परळमध्ये मंडळांच्या मोठमोठ्या गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागते. त्या मूर्तींना आकर्षक आणि सुबक बनवण्यात विजय खातू यांचा हातखंडा होता. लालबागच्या राजाची मूर्ती देखील त्यांनी काही वर्ष घडवली होती. मूर्ती घडवण्यात ते फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी साकारलेल्या मूर्तींना परदेशातही मोठी मागणी असायची.

त्यांचे वडील रामकृष्ण खातू यांच्याकडूनच त्यांनी ही मूर्ती घडवण्याची कला आत्मसात केली होती. वडिलांनंतर त्यांनी पुढे ती परंपरा कायम ठेवली. गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी 25 फूटांपेक्षा जास्त उंचीच्या अनेक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिस पर्यावरणासाठी घातक असल्याने त्यांनी शाडूच्या मातीपासून मूर्ती साकारण्यास सुरुवात केली होती.  


हेही वाचा -

ना. म. जोशी मार्ग गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा

जय बजरंग क्रीडा मंडळाचा बाप्पा


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा