Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कर्जमाफी नाहीच!


मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कर्जमाफी नाहीच!
SHARES

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देऊनही कर्जमाफीचे घोंगडे भिजतच आहे. तांत्रिक कारणांमुळे प्रत्यक्ष कर्जमाफीला उशीर होत असून, संपूर्ण कर्जमाफी कधी होईल? या प्रश्नाचे उत्तर देताना सहकार विभागाच्या नाकीनऊ आले आहेत. दरम्यान बँकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा 66 कॉलमचा फॉर्म भरताना झालेल्या गडबडीमुळे आधार क्रमांक आणि अन्य तांत्रिक अडचणी झाल्या असल्याचे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.


सहकार विभागाची झोप उडाली -

कर्जमाफीची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी सहकार विभागावर प्रचंड भार आहे. या प्रकियेत गेल्या महिन्याभरापासून विभागाच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम केले आहे. अजूनही रात्र-रात्र जागून हे अधिकारी यावर काम करत आहेत. आधार आणि तांत्रिक घोळ समोर आल्यानंतर पुन्हा लिस्ट चूक असेल तर पैसे ट्रान्सफर करता येत नाहीत म्हणून ही यादी पुन्हा तपासून काम करायला हाती घेतले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. आता युद्धपातळीवर आयटी टीम आणि शासन या कामासाठी जुंपले असल्याची माहिती आहे.

काही लाख क्लियर शेतकऱ्यांची विना तक्रार यादी शुक्रवारी घोषित होण्याची चिन्हे आहेत. काही लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होतील असे सूत्रांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हीसीवर प्रत्येक जिल्ह्याचा आढावा गुरुवारच्या बैठकीत घेतला असून, आता प्रत्येक दिवशी आढावा घेतला जात असल्याची माहिती आहे.



हेही वाचा - 

'बहुत नाइंसाफी है'! आधार नंबर एक, लाभ मात्र शेकडो शेतकऱ्यांना!!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा