Advertisement

अखेर कर्जमाफीला सुरूवात


अखेर कर्जमाफीला सुरूवात
SHARES

राज्य सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी केल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर बुधवारपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात झाली आहे.

मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ‘आपलं सरकार’ या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.

पहिल्या टप्प्यात १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ
सुरुवातीला १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पाहिल्या टप्प्यात लाभ मिळेल, असा दावा सरकारने यावेळी केला. दररोज २ ते ५ लाख खाती निकाली काढण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.


काय म्हणाले मुख्यमंत्री?

  • जाहीर केलेली कर्जमाफी आजपासून कार्यान्वित
  • आमच्या सर्वांकरता कर्तव्यपूर्तीचा दिवस, कर्जमाफी अंतिम उपाय नाही
  • शेतीला मदत आणि पुनर्वसन पुरतं मर्यादित ठेवायचं नाही
  • जलयुक्त शिवारच्या माध्यमातून काही ठिकाणी तीन पिकं घेतली जात आहेत
  • शेतकऱ्याला या रचनेतून कर्ज मिळेल यासाठी प्रयत्न
  • शेतकऱ्याला कर्जफेड करण्याइतपत सक्षम बनवू
  • बँकांच्या आकडेवारीनुसार कर्जमाफीची रक्कम ३४ हजार कोटीपर्यंत गेली
  • एवढा मोठा बोजा आमच्यासाठी आव्हान होतं
  • ऑनलाइन प्रक्रियेवर खूप टीका झाली मात्र आम्ही ती सहन केली.
  • कर्जमाफीच्या यादीत मुंबईतून शेतकरी कुठून आले हे शोधावंच लागेल
  • कर्जमाफीसाठी एकच खाते उघडलं असून त्यात एकत्रित पैसे जमा होतील
  • यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होतील
  • शेतकऱ्यांच्या ८.४ लाख खात्यांपैकी ४ लाख ६२ हजार खाती कर्जमाफीची आहेत
  • कर्जमाफीचे ३२०० कोटी या खात्यात जमा होतील
  • निकषांमध्ये बसणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत प्रक्रिया सुरू राहील



हेही वाचा -

दिवाळीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा