Advertisement

तुमच्या ताटातली 'कोंबडी' तुम्हाला पाडू शकते आजारी

एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार रोगट कोंबड्या मारून वा आजराने मेलेल्या कोंबड्या विकल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एफडीएनं पालिकेच्या मदतीने शनिवारी शिवडीतील एका झोपडपट्टीमधील चिकन विक्रेत्यांच्या दुकानावर धाड मारली. त्यावेळी रोगट कोंबड्या मारून त्या स्वच्छ करून विकल्या जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली.

तुमच्या ताटातली 'कोंबडी' तुम्हाला पाडू शकते आजारी
SHARES

चिकन, चिकन लॉलीपॉप, चायनीज यावर ताव मारायला कुणाला आवडत नाही. त्यातही कोंबडीप्रेमी तर अशा खाण्यावर तुटून पडतात. रविवारी तर अनेकांना ताटात कोंबडीच हवी असते. पण मुंबईकरांनो सावधान! तुमच्या ताटातली कोंबडी सुरक्षित आहे ना? हो...सुरक्षित आहे ना? असा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे. कारण तुम्ही जी कोंबडी वा चायनीज खात असाल ती तुम्हाला आजारी पाडू शकते आणि हे सिद्ध झालंय अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आणि मुंबई महानगर पालिकेच्या एकत्रित कारवाईतून.


नाहीतर जीवावर बेतेल

मेलेल्या आणि रोगट कोंबड्या ज्या नष्ट करायच्या असतात वा कचऱ्यात फेकून द्यायच्या असतात, त्या कोंबड्या तुमच्या ताटात पोहचवल्या जात असल्याची धक्कादायक बाब या कारवाईतून समोर आली आहे. अशा कोंबड्यांपासून बनवलेले पदार्थ खाणं तुमच्या जीवावर बेतू शकते. तुम्हाला ही कोंबडी आजारी पाडू शकते, अशी माहिती एफडीएच्या अन्न विभागाचे सह-आयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. स्वार्थापोटी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कोंबडी विक्रेत्यांना दणका देत 34 किलो घातक आणि खराब चिकन ताब्यात घेतल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


शिवडीतल्या दुकानावर धाड

एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार रोगट कोंबड्या मारून वा आजराने मेलेल्या कोंबड्या विकल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एफडीएनं पालिकेच्या मदतीने शनिवारी शिडवतील रे रोड स्थानकाजवळी नाथ पै मार्गावर असलेल्या बारादेवी झोपडपट्टीतल्या एका दुकानात धाड मारली. त्यावेळी रोगट कोंबड्या मारून त्या स्वच्छ करून विकल्या जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. त्यातही या कोंबड्या रस्त्यावरील चायनीज गाड्यांना हे चिकन विकलं जात असल्याचं समोर आलं आहे. तर मेलेल्या कोंबड्या फेकून न देता वा नष्ट न करता विकल्या जात असल्याचंही उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे मेलेल्या रोगट कोंबड्या कचऱ्यात फेकल्यानंतर झोपडपट्टीधारक त्या उचलून आणून साफ करून चायनीज गाड्यांना विकत असल्याचंही सिद्ध झाल्याचं साळुंखे यांनी सांगितलं आहे.


'पोलिसांचं दुर्लक्ष'

यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते बाळा वेंगुर्लेकर यांनी याबाबत पालिका आणि अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष वेधून घेतलं. त्यानुसार पालिकेच्या अन्न व औषध विभागाने ही कारवाई केली. या संपूर्ण प्रकाराची माहिती असताना त्याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील आर.ए.किडवाई मार्गाचे पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वेंगुर्लेकर यांनी केला आहे.

एफडीएचा परवानाच नाही

ज्या चिकन विक्रेत्यांकडून मुंबईकरांच्या जीवाशी असा खेळ केला जात आहे, त्या विकेत्याकडे एफडीएचा परवाना नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एफडीएनं यावेळी 34 किलो चिकन जप्त केलं आहे. तर पालिकेने विक्रेत्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता त्याच्याविरोधात एफडीएकडून न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याचं साळुंखे यांनी सांगितलं आहे. चिकन खरेदी करताना वा चायनीज गाड्यांवर चायनीज खाताना विशेष काळजी घेण्याचं आवाहनही साळुंखे यांनी केलं आहे. तर अशी बाब आढळल्यास एफडीएकडे तक्रार करण्याचीही सूचना केली आहे.


आरोपीची जामिनावर मुक्तता

शिवडीच्या बारा देवी झोपडपट्टीत हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालिका, पोलिस आणि एफडीए यांनी एकत्रितरित्या केलेल्या कारवाईत निमिश लक्ष्मण डागळ याच्या झोपडीतून 34 किलो खराब चिकन जप्त करत निमिशवर कलम 410 बीएमसी कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केल्याची माहती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भागवत बनसोडे यांनी दिली आहे.    हेही वाचा - 

महिला शौचालयात अश्लील चित्रीकरण करणाऱ्याला अटक

सरकारी कर्मचारी संपावर, मंत्रालयात शुकशुकाट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा