महिला शौचालयात अश्लील चित्रीकरण करणाऱ्याला अटक


महिला शौचालयात अश्लील चित्रीकरण करणाऱ्याला अटक
SHARES

चर्नीरोड परिसरातील एका खासगी कंपनीतील शौचालयात आॅफिस बाॅयने महिलेचा अश्लील व्हिडियो काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अरविंद विठ्ठल अहिरे (३२) असं या आरोपीचं नाव आहे. शौचास गेलेल्या महिलेचं व्हिडियो चित्रीकरण करताना अंगावर पडलेल्या धुळीमुळे तिचं लक्ष गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.


लपवलेला मोबाईल दिसला

चर्नीरोड परिसरातील एका खासगी कंपनीत पीडित महिला गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. सकाळी कार्यालयात आल्यानंतर पीडित महिला शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या अंगावर छतावरून धूळ पडल्यानं तिचं लक्ष छतावर गेले. त्यावेळी लपवलेला मोबाईल तिच्या निदर्शनास पडला. घाबरलेल्या तरुणीनं तो मोबाइल पाहिला असता, त्यामध्ये अापला व्हिडियो चित्रीत झाल्याचं तिनं पाहिलं. इतकंच नाही तर अन्य महिला कर्मचाऱ्यांचेही अश्लील व्हिडियो त्यात होते.


अखेर चोर सापडला

याबाबत महिलेनं इतर महिला कर्मचाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यावेळी सर्व महिलांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातल्यानंतर संबधित मोबाईल धारकावर गुन्हा नोंदवण्यात आला. तपासाअंती हा मोबाईल कार्यालयातील अाॅफिसबाॅय अरविंद विठ्ठल अहिरे याचा असल्याचं लक्षात अालं. हे प्रकरण चिघळल्याचं समजल्यानंतर अरविंदनं घरी पळ काढला होती. पण चर्नीरोड पोलिसांनी गुन्हा नोंदवत अरविंदला अटक केली आहे.


हेही वाचा -

बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर अात्महत्या

चोरट्यांना ऑनलाईन शॉपिंग पडली महागात

भोजपुरी अभिनेत्रीला धमकावणारा अटकेत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा