Advertisement

आंबे खा जपून! 'एपीएमसी'त होतोय रसायनांचा वापर

आयुक्तांच्या आदेशानुसार गेल्या ३ दिवसांपासून एपीएमसी मार्केटची तपासणी सुरू असून आतापर्यंत आंबे पिकवण्यात येणाऱ्या २९ ठिकाणांची तपासणी केली आहे. त्यात ३ ठिकाणी आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याच्या संशयावरून अंदाजे ३० हजार रुपये किंमतीचे १०९ डझन आंबे जप्त करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त (अन्न), ठाणे, एफडीए सुरेश देशमुख यांनी दिली.

आंबे खा जपून! 'एपीएमसी'त होतोय रसायनांचा वापर
SHARES

गेल्या तीन-चार दिवसांपासून सोशल मीडियावर आंब्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड केमिकलचा वापर केल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी (एपीएमसी) इथला असल्याचंही म्हटलं जात आहे. या व्हायरल व्हिडिओची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)च्या ठाणे विभागाला एपीएमसीच्या तपासणीचे आदेश दिल्याची माहिती एफडीए आयुक्त पल्लवी दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


किती डझन आंबे जप्त?

आयुक्तांच्या आदेशानुसार गेल्या ३ दिवसांपासून एपीएमसी मार्केटची तपासणी सुरू असून आतापर्यंत आंबे पिकवण्यात येणाऱ्या २९ ठिकाणांची तपासणी केली आहे. त्यात ३ ठिकाणी आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याच्या संशयावरून अंदाजे ३० हजार रुपये किंमतीचे १०९ डझन आंबे जप्त करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त (अन्न), ठाणे, एफडीए सुरेश देशमुख यांनी दिली.


होतोय इथिलिनचा वापर

महत्त्वाचं म्हणजे एपीएमसी मार्केटमध्ये कॅल्शियम कार्बोईड पावडरचा वा स्प्रेचा कोणताही वापर होत नसला तरी इथिलिन या संप्रेरकाचा वापर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. इथिलिनचा वापर ठराविक प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास असे आंबे खाऊन पोटदुखी, उलटी-जुलाब आणि इतर त्रास खाणाऱ्याला होऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आंबे खाताना-खरेदी करताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.


कॅल्शियम कार्बोईड घातक

झाडावर नैसर्गिकरित्या आंबे पिकण्यासाठी बराच वेळ लागतो. आंब्यांची वाढती मागणी असल्यानं कच्चे आंबे आणून ते लवकरात लवकर पिकवण्यासाठी विक्रेते कॅल्शियम कार्बोईडच्या पावडरचा वापर करतात. या पावडरचा वापर केलेले आंबे खाणं हे शरीरास घातक असतं. त्यामुळे दरवर्षी एफडीएकडून एप्रिल-मेदरम्यान अशा रितीने आंबे पिकवणाऱ्यांवर कारवाई केली जाते. यंदाही मुंबई आणि ठाण्यात एफडीएकडून आंब्यांची विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचं एफडीएनं सांगितलं आहे.


नमुने प्रयोगशाळेत

एपीएमसी मार्केटमधील कारवाईत यंदा कार्बोईडएेवजी इथेफाॅल या संप्रेरकाचा वापर होत असल्याचं दिसून आलं आहे. फळांची वाढ करण्यासाठी या संप्रेरकाचा वापर होतो. २ पीपीएमपर्यंत इथेफाॅल वापरण्यास कायद्यानं परवानगी आहे. तर इथिलिन गॅसचा वापर १०० पीपीएमपर्यंत करता येतो.

त्यानुसार एपीएमसी मार्केटमध्ये इथिलिन आणि इथिलिन गॅसचा वापर तीन ठिकाणी करण्यात येत असल्याचं दिसून आलं. हे प्रमाण अधिक असल्याच्या संशयावरून १०९ डझन आंबे जप्त करण्यात आले आहेत. आंब्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून यासंबंधीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचंही देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.


बिनधास्त ताव मारा

इथिलिन प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि असे आंबे जास्तीत जास्त खाल्ले तर जळजळ, मळमळ, पोटदुखीसारखे त्रास होऊ शकतात. पण यंदा कृत्रिमरित्या आंबे पिकवण्याचा प्रमाण कमी झाल्याचं सांगत आंबे खरेदी करताना थोडी काळजी घ्या, पण आंब्यांवर बिनधास्त ताव मारा, असं आवाहन ग्राहकांना केलं आहे.



हेही वाचा-

ना रत्नागिरी, ना देवगडचा... हापूस तर अख्ख्या कोकणाचा!

...म्हणून हा आहे 'फळांचा राजा'!

आंबा कसा ओळखाल? काय काळजी घ्याल?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा