Advertisement

ना रत्नागिरी, ना देवगडचा... हापूस तर अख्ख्या कोकणाचा!


ना रत्नागिरी, ना देवगडचा... हापूस तर अख्ख्या कोकणाचा!
SHARES

आंबा म्हटलं की सर्वात आधी तोंडात चव रेंगाळते ती हापूस आंब्याचीच. हापूस आंब्याची ही चव सातासमुद्रा पारही गेली आहे. असा हा चविष्ट हापूस आंबा नेमका कुणाचा? देवगडचा की रत्नागिरीचा, अर्थात हापूसच्या पेटंटवरून गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही ठिकाणच्या उत्पादकांमध्ये वाद सुरू होता. अखेर हा वाद आता मिटला असून आता हापूस रत्नागिरी वा देवगडचा राहिला नसून तो आख्ख्या कोकणाचा झाला आहे. मुंबईतील इंडियन पेटंट कार्यालयानं हा निर्णय देत रत्नागिरी आणि देवगड या दोन्ही ठिकाणच्या उत्पादकांना दणका दिला आहे.


वाद संपता संपेना

हापूस आंबा नेमका कुणाचा, म्हणजेच देवगडचा की रत्नागिरीचा असं म्हणत हापूसच्या पेटंटवरून उत्पादकांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद अखेर इंडियन पेटंट कार्यालयापर्यंत पोहचला. या वादाचं कारण म्हणजे रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस या दोन्ही आंब्यांना जीआय मानांकन २०१७ मध्ये देण्यात आलं. त्यातूनच पेटंटचा वाद सुरू झाला आणि वाद पुढे वाढतच गेला.


उत्पादकांना दणका

हा वाद इंडियन पेटंट कार्यालयात गेला तिथे यावर सुनावणी सुरू झाली. त्यानुसार गुरुवारी इंडियन पेटंट कार्यालयानं यावरील अंतिम निर्णय देत रत्नागिरी आणि देवगड अशा दोन्ही ठिकाणच्या उत्पादकांना चांगलचा दणका दिला आहे. देवगडचा की रत्नागिरीचा हापूस असा वाद असताना पेटंट कार्यालयानं हापूस हा आख्ख्या कोकणाचा असल्याचा निर्णय दिला आहे. 

पालघरपासून सिंधुदूर्गापर्यंत कोकणच्या कोणत्याही पट्ट्यात पिकणारा आंबा हा हापूस असल्याचं पेटंट कार्यालयानं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही उत्पादकांची निराशा का होईना पण पेटंट कार्यालयाचा निर्णय मान्य केल्याचं समजत आहे.



हेही वाचा-

मधुमेहींनी आंबा खावा की नाही?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा