Advertisement

तुम्ही घाण पाण्याची आईस्क्रिम तर खात नाहीय ना?

अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने कारवाई करत हा प्रकार उघडकीस आणला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एफडीएकडून विशेष मोहीम राबवत बर्फ, ज्यूस आणि आईस्क्रिमच्या विक्रीवर करडी नजर ठेवली जाते. त्यानुसार एफडीएच्या बृहन्मुंबई विभागा (अन्न)ला १९ मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कांदिवलीच्या चारकोप येथील आरएससी २३, प्लाॅट नं. ८२, सेक्टर ८ इथल्या मे. दिप्ती डेझर्टच्या कारखान्यावर धाड टाकली. यावेळी एफडीए अधिकाऱ्यांना काही दिसलं ते अत्यंत धक्कादायक होतं.

तुम्ही घाण पाण्याची आईस्क्रिम तर खात नाहीय ना?
SHARES

मुंबईतल्या उकाड्यानं हैराण झालेले मुंबईकर ज्यूस, बर्फाचा गोळा आणि आईस्क्रिम-कुल्फीवर ताव मारताना दिसतात. त्यातही लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रिम-कुल्फी केव्हाही फेव्हरेटचं. पण मुंबईकरांनो, तुम्ही खात असलेली आईस्क्रिम-कुल्फी आरोग्यासाठी धोकादायक तर नाही ना? याचाही विचार करा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे मुंबईत अत्यंत गलिच्छ वस्तीत, घाणीत, खराब भाड्यांमध्ये आईस्क्रिम-कुल्फी तयार केलं जात असल्याची, त्यासाठी मुदत संपलेले रंग आणि इतर पदार्थ वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कांदिवलीत धाड

अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)ने कारवाई करत हा प्रकार उघडकीस आणला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एफडीएकडून विशेष मोहीम राबवत बर्फ, ज्यूस आणि आईस्क्रिमच्या विक्रीवर करडी नजर ठेवली जाते. त्यानुसार एफडीएच्या बृहन्मुंबई विभागा (अन्न)ला १९ मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कांदिवलीच्या चारकोप येथील आरएससी २३, प्लाॅट नं. ८२, सेक्टर ८ इथल्या मे. दिप्ती डेझर्टच्या कारखान्यावर धाड टाकली. यावेळी एफडीए अधिकाऱ्यांना काही दिसलं ते अत्यंत धक्कादायक होतं.परिस्थिती काय होती?

गलिच्छ ठिकाणी आईस्क्रिम आणि कुल्फी तयार केली जात असल्याचं यावेळी दिसून आल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त (अन्न), बृहन्मुंबई, एफडीए यांनी दिली. याठिकाणी आईस्क्रिम-कुल्फी तयार करण्यासाठी जी भांडी आणि उपकरण वापरली जात होती ती अत्यंत खराब होती, पाणीही अशुद्ध होतं, इतकंच नव्हे तर रंग, फ्लेव्हरसाठी वापरण्यात येणार पदार्थ मुदतबाह्य असल्याचंही आढळून आल्याचंही आढाव यांनी सांगितलं. आईस्क्रिम-कुल्फीच्या पॅकिंग आणि लेबलिंगमध्येही गोंधळ असल्याचं दिसून आलं.नियमांचं उल्लंघन

अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन मे. दिप्ती डेझर्टकडून केलं जात असल्याचं निष्पन्न झाल्यानं याप्रकरणी कारवाई करत एफडीएनं आईस्क्रिम-कुल्फी जप्त करत नष्ट केली. १० किलोची आणि ३,७५० रुपये किंमतीची मलई कुल्फी यावेळी जप्त करण्यात आली. तर १७८ लिटरचं आणि ४८,९५० रुपये किंमतीचं बटरस्काॅच आईस्क्रिम जप्त करण्यात आलं. मलई कुल्फी आणि आईस्क्रिमचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असंही आढाव यांनी सांगितलं.अशी आईस्क्रिम खाल्ल्यास...

असं खराब आईस्क्रिम-कुल्फी खाणं आरोग्यास धोकादायक ठरू शकतं. अशी आईस्क्रिम खाल्ल्यास पोटदुखी, जुलाब, उलट्या आणि पोटाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आईस्क्रिम-कुल्फीबरोबरच कोणतेही अन्नपदार्थ खरेदी करताना-खाताना जरा काळजी घ्या, ब्रॅण्डेड अन्नपदार्थ खरेदी करा, खरेदी केलेल्या अन्नपदार्थांवरील लेबल काळजीपूर्वक वाचून घ्या, असं आवाहन एफडीएकडून करण्यात आलं आहे.हेही वाचा-

आंबे खा जपून! 'एपीएमसी'त होतोय रसायनांचा वापर

निपाह व्हायरसमुळे मुंबईसह पुण्यात अलर्टRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा