Advertisement

'एफडीए'ला मिळाले ४६ अन्न निरीक्षक


'एफडीए'ला मिळाले ४६ अन्न निरीक्षक
SHARES

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार ४० हजार लोकसंख्येच्या मागे एक अन्न निरीक्षक आणि एक औषध निरीक्षक असायला हवा. असे असताना राज्यात मात्र १ लाख ३५ हजार लोकसंख्येच्या मागे एक अन्न निरीक्षक आणि एक औषध निरीक्षक अशी गंभीर परिस्थिती आहे.

गेल्या कित्येक वर्षांत अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) तील रिक्त जागा भरलेल्याच नसल्याने अन्न-औषध निरीक्षकच नव्हे, तर सर्वच वर्गातील कर्मचाऱ्यांची 'एफडीए'त वानवा आहे. याचा 'एफडीए'च्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होऊ लागल्याने अखेर 'एफडीए'तील रिक्त पदे भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार लवकरच 'एफडीए'ला ४६ नवे अन्न निरीक्षक मिळणार असल्याची माहिती 'एफडीए'च्या आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

नव्या अन्न निरीक्षकांच्या नियुक्तीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून हे अन्न निरीक्षक लवकरच सेवेत दाखल होतील. नव्या अन्न निरीक्षकांमुळे कामाचा वेग वाढेल, असे दराडे यांनी स्पष्ट केले आहे.

अन्न निरीक्षकांच्या ४६ पदांसोबतच एक सहआयुक्त (अन्न) पद भरण्यात आले असून ६ सहआयुक्त (औषध) यांची पदेही भरण्यात आली आहेत. सहाय्यक आयुक्तां (अन्न) ची १९ पदे भरली असून ४ फूड अँनालिस्टची पदेही भरण्यात आल्याचे आयुक्त दराडे यांनी सांगितले.

माहिती अधिकाराखाली उघड झालेल्या माहितीनुसार 'एफडीए'त एकूण १,१७६ इतकी मंजूर पदे असताना केवळ ८११ पदेच भरण्यात आली आहेत. त्यानुसार अजूनही ३६५ अर्थात ३१ टक्के पदे रिक्त आहेत.


पद
 मंजूर जागा
रिक्त जागा
अन्न निरीक्षक
२६५
७८
औषध निरीक्षक
१६१
३७
अन्न सहाय्यक आयुक्त
६२
२२
वैज्ञानिक अधिकारी
३४
१३
वरिष्ठ अधिकारी
०८
०४
सहाय्यक आयुक्त
५२
२२
प्रशासकीय अधिकारी
१२

नमुना सहाय्यक
६०
२३
प्लँट आॅपरेटर


  

'एफडीए'तील ही मंजूर पदे ३० ते ४० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच ही पदे त्यावेळच्या गरजेनुसार मंजूर करण्यात आली होती. २०१७ मध्ये वाढलेली लोकसंख्या आणि कामाच्या व्याप्तीचा विचार करता ही पदे आणखी वाढवण्याची किंबहुना एफडीएतील पदांचा पुनर्विचार करत नव्याने प्रस्ताव तयार करण्याची गरज व्यक्त होत आहे.


अन्न निरीक्षक-औषध निरीक्षकांसह कर्मचारी-अधिकाऱ्यांची मोठी वानवा 'एफडीए'त होती. ही दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून आता बऱ्यापैकी रिक्त जागा भरण्यात आल्या आहेत. तर उर्वरित जागा लवकरच भरण्यात येतील. त्यातही आणखी नव्याने पदे निर्माण करत 'एफडीए'ला आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत.
- डाॅ. पल्लवी दराडे, आयुक्त, एफडीए


माहिती अधिकाराखाली ही माहिती आम्ही उघड केल्यानंतर रिक्त पदे भरण्यासाठी एफडीएसह, राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. उशीरा का होईना पण सरकार आणि 'एफडीए' जागे झाले आहे. 'एफडीए'ने आता सर्वच्या सर्व रिक्त जागा भराव्यात, नवीन पदे निर्माण करावी. कारण एफडीएकडे खूप महत्त्वाची जबाबदारी आहे, ती पार पाडण्यासाठी मनुष्यबळ मजबूत असणे गरजेचे आहे.
- अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते




हे देखील वाचा -

सरकारी बाबूंचा कामचुकारपणा उघड

स्टेंटच्या नावाने रूग्णांची लूट ?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा