Advertisement

मगनलाल चिक्कीचं उत्पादन थांबवण्याचे अादेश; एफडीएची कारवाई

मगनलाल कंपनीकडून खाद्यपदार्थांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये तयार केलेल्या अन्नपदार्थांची विक्री करण्याआधीच त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करणं कंपन्यांना कायद्यानुसार बंधनकारक आहे. असं असताना इतक्या मोठ्या कंपनीकडून या कायद्याचं उल्लंघन केलं जात आहे.

मगनलाल चिक्कीचं उत्पादन थांबवण्याचे अादेश; एफडीएची कारवाई
SHARES

मुंबई-पुणे प्रवास करणारा वा खंडाळा-लोणावळ्याला भटकंतीसाठी जाणारा प्रत्येक पर्यटक-प्रवाशी मगनलाल चिक्की खाऊन आणि घेऊन येतोच.  लोणावळा आणि मगनलाल चिक्की असं समीकरणच तयार झालं आहे. संपूर्ण राज्यात मगनलाल चिक्की प्रसिद्ध आहे. पण आता याच प्रसिद्ध मगनलाल चिक्कीच्या दर्जावर आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे. यापुढं ही चिक्की कधी खावी की नाही असा प्रश्नही आता अनेकांना पडल्याशिवाय राहणार नाही. 

कारण या चिक्कीचं उत्पादन करणाऱ्या मगनलाल फूड प्रोडक्टस कंपनीकडून अन्न सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याची धक्कादायक बाब अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) च्या कारवाईतून समोर आली आहे. ही चिक्की खाण्यास योग्य नसल्याचं म्हणत एफडीएनं चिक्कीचं उत्पादन-विक्री थांबवण्याचे आदेश कंपनीला दिल्याची माहिती एफडीए आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. 


कायद्याचं उल्लंघन

अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत एफडीएकडून हाॅटेल, रेस्टाॅरन्ट, स्टाॅल, सरकारी-खासगी स्वयंपाकगृह, उपहारगृह आणि अन्नपदार्थांचं उत्पादन-विक्री करणाऱ्या कंपन्यांवर करडी नजर ठेवली जाते, तपासणी केली जाते. त्यानुसार पुणे एफडीएकडून मगनलाल फूड प्रोडक्टस कंपनीची तपासणी केली असता प्रसिद्ध आणि चविष्ट अशा मगनलाल चिक्कीचं उत्पादन करताना अन्न सुरक्षा कायद्याचे पालन न करत ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचं समोर आल्याची माहिती सुरेश देशमूख,  सहआयुक्त (अन्न), पुणे, एफडीए यांनी दिली आहे.


चिक्की खाण्यास अयोग्य

मगनलाल कंपनीकडून खाद्यपदार्थांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये तयार केलेल्या अन्नपदार्थांची विक्री करण्याआधीच त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करणं कंपन्यांना कायद्यानुसार बंधनकारक आहे. असं असताना इतक्या मोठ्या कंपनीकडून या कायद्याचं उल्लंघन केलं जात आहे.

फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्ड अॅथाॅरिटी आॅफ इंडिया (एफएसएआय) च्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून वा स्वत: च्या प्रयोगशाळेतून ही तपासणी करून घ्यायची असते. पण मगनलाल कंपनीकडून कुठल्याही प्रयोगशाळेत चिक्कीची तपासणी होत नसल्यानं ही चिक्की खाण्यास योग्य नसल्याचा ठपका एफडीएनं ठेवला आहे.


उत्पादन, विक्री नाहीकायद्याचं उल्लंघन

 त्यानुसार कंपनीविरोधात कडक कारवाई करत तात्काळ चिक्कीचं उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश एफडीएनं दिले आहेत. जोपर्यंत कायद्यानुसार आवश्यक त्या सर्व अटींची पूर्तता कंपनीकडून होत नाही तोपर्यंत कंपनीला चिक्कीचं उत्पादन आणि विक्री करता येणार नाही. त्यामुळं आता मगनलाल चिक्की पुढचे काही दिवस तरी लोणावळा आणि आसपासच्या ठिकाणी दिसणार नाही.हेही वाचा - 

कमी खर्चात स्तन प्रत्यारोपण करणं पडलं महागात

पालकांनो, घाबरू नका, गोवर-रूबेला लसीकरण करा- महापालिका
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा