Advertisement

ठाणे-दिवा पाचवी, सहावी मार्गिका प्रवाशांच्या सेवेत

मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पुर्ण झालं आहे.

ठाणे-दिवा पाचवी, सहावी मार्गिका प्रवाशांच्या सेवेत
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली ठाणे-दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पुर्ण झालं आहे. तसंच, मंगळवारपासून ही मार्गिक प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधून सुटणाऱ्या व त्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल, मेल, एक्स्प्रेस गाड्यांना ठाणे ते दिवादरम्यान स्वतंत्र मार्गिका उपलब्ध नसल्याने वेळापत्रक विस्कळीत होत होते. मात्र आता हा प्रवास विनाअडथळा होणार आहे. ठाणे-दिवा सहाव्या मार्गिकेसाठी ७२ तासांचा ब्लॉक सोमवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. यात मोठ्या प्रमाणात कामं पूर्ण करण्यात आली. २३ जानेवारीला १४ तासांचा ब्लॉक घेतल्यानंतर पाचवी मार्गिका सुरु झाली होती.

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना प्रवासात होणारा त्रास कमी करण्यासाठी ‘एमआरव्हीसी’ (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) आणि मध्य रेल्वेने ठाणे ते दिवादरम्यान पाचवी, सहावी मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेतला होता. २००८-०९ साली या मार्गिकेला मंजुरी मिळाल्यानंतर अन्य प्रक्रिया पूर्ण करुन कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु, रुळांजवळील अतिक्रमण, तांत्रिक अडचणी इत्यादींमुळं प्रकल्पाचे काम लांबले आणि सुरुवातीच्या पाच वर्षांनंतर सेवेत येणे अपेक्षित असलेली मार्गिका उपलब्ध होण्यासाठी २०२२ साल उजाडले.

पाचव्या, सहाव्या मार्गिकेला अंतिम स्वरुप देण्यासाठी ४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. यामध्ये ५०० हून अधिक कर्मचारी कार्यरत होते. याआधी १९ डिसेंबर २०२१ मध्ये १८ तासांचा, त्यानंतर २ जानेवारी २०२२ ला २४ तासांचा, ८ जानेवारीला ३६ तासांचा, २३ जानेवारीला १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

मेल, एक्स्प्रेससाठी ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचवी, सहावी मार्गिका सेवेत येणार असल्याने लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत होईल.  त्यामुळं टप्प्याटप्याने सुमारे ८० लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत असल्याचं समजतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा