Advertisement

'मैदान वाचवा, खेळ वाचवा'


'मैदान वाचवा, खेळ वाचवा'
SHARES

नायगाव - पुनर्विकासाच्या नावाखाली दादर - नायगाव परिसरातील नामांकित डॉ. एन. ए. पुरंदरे स्टेडियम या ठिकाणी क्लब हाऊस उभारण्यात येणार होती. अनेक नामांकित खेळाडू इथे घडले असून येणाऱ्या पिढीसाठी हे स्टेडियम असेच राहावे अशी मागणी करण्यात आली आहे. 'मैदान वाचवा, खेळ वाचवा' या मोहिमेअंतर्गत रविवारी एका जाहीर सभेचे आयोजन पुरंदरे मैदान बचाव समितीच्या वतीने स्टेडियममध्ये करण्यात आले होते. यात एकमताने पालिकेच्या मनमानी कारभाराचा जाहीर निषेध करण्यात आला. ही बातमी प्रथम मुंबई लाइव्हने दाखवली होती. या वेळी स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर, नगरसेविका उर्मिला पांचाळ, नगरसेवक अमेय घोले, माजी नगरसेवक सुनील मोरे यांच्यासह शेकडो स्थानिक आणि खेळाडू उपस्थित होते.

या जाहीर सभेत आमदार कालिदास कोळंबकर यांना सदर मुद्दा अधिवेशनात मांडावा आणि स्टेडियम खेळाडूंसाठी राखीव ठेवावे अशी मागणी केली असता काँग्रेसच्या 19 आमदारांचं निलंबन झालं असल्याने हा मुद्दा अधिवेशनात मांडता येणार नाही. तरी या मैदानाबाबत सविस्तर माहिती पुराव्यासहित देण्यात यावी, या लढ्यात आपण त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही कोळंबकर यांनी या वेळी दिली.

नागरिक रस्त्यावर उतरणार

संगणकीय युगात खेळ हरवत चालले आहेत. मात्र ज्या खेळाडूंना घडायचं आहे आणि जे खेळाडू या स्टेडियममधून घडले आहेत. ही त्यांच्या सर्वांच्या अस्तित्वाची लढाई आहे. मैदान आणि खेळ दोन्ही वाचवायचे असल्याने नायगावमधील हे ऐतिहासिक स्टेडियम हडपण्याचा पालिकेचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा एकमताने स्थानिक नागरिक आणि पुरंदरे मैदान बचाव समितीने दिला आहे. तर यासंदर्भाची माहिती 'मुंबई लाइव्ह' वेळोवेळी देत राहील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा