Advertisement

मध्य रेल्वेच्या हँकॉक पुलाची लवकरच होणार पुनर्बाधणी

माझगाव येथील बहुचर्चित हँकॉक पुलाची (Hancock Bridge) पुनर्बाधणीच्या कामाला वेग येणार आहे.

मध्य रेल्वेच्या हँकॉक पुलाची लवकरच होणार पुनर्बाधणी
SHARES

माझगाव येथील बहुचर्चित हँकॉक पुलाची (Hancock Bridge) पुनर्बाधणीच्या कामाला वेग येणार आहे. मागील २ वर्षांपासून पुलाची पुनर्बाधणी (Repaire) रखडली होती. मात्र, आता रेल्वेच्या (Railway) हद्दीत गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनानं मान्यता दिली आहे. तसंच, रेल्वेच्या हद्दीतील जागेत बांधकाम (Construction) करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयोगाला (सीआरएस)नं देखील अंतिम मंजुरी (Final approval) दिल्याची माहिती समोर येत आहे.

मध्य रेल्वेच्या सॅण्डहर्स्ट रोड (Sandhurt Road) स्थानकाजवळील हँकॉक ब्रिज (Hancock Bridge) धोकादायक ठरवण्यात आला. त्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये मध्य रेल्वेनं हा पूल पाडला. मात्र, तेव्हापासून या पूलाची पुनर्बाधणी झाली नाही. त्यामुळं पूलाच्या नजीकच्या परिसरात राहणाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. मात्र, लवकरच पूलाची पुनर्बाधणी होत असल्यानं त्यांना दिलासा मिळाला आहे.

महापालिकेने पूल उभारणीची अंतिम योजना ९ डिसेंबर २०१९ रोजी रेल्वेकडे सादर केली. ही योजना १६ डिसेंबर रोजी मंजूर करण्यात आल्याचं समजतं. रेल्वे मार्गावरील स्ट्रील गर्डरचे काम चंडिगड येथील फॅक्टरीत पूर्ण झालं आहे. हा लोखंडी गर्डर रेल्वे मार्गावर टाकण्यासाठी मध्य रेल्वेच्या पूल विभागाशी (Central Railway Pool Department) महापालिकेनं (BMC) पत्रव्यवहार केला. दरम्यान, रेल्वेच्या प्रमुख अभियंत्यांनी या कामाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा आयोगाकडं अंतिम मंजुरीसाठी (Final approval) सादर करण्यात आला आहे.



हेही वाचा -

चित्रकला परीक्षांच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव गुण

मुंबईमध्ये दीड वर्षांत ८१ हजार किलो प्लास्टिक जमा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा