Advertisement

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप

मेजर राणे ४ आॅगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. पण, शहीद होण्याअगोदर त्यांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या चकमकीत त्यांच्यासोबत लष्कराचे ३ जवानही शहीद झाले.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप
SHARES

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण आलेले मिरा रोड येथील रहिवासी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना गुरूवारी लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्याच्यावर जाॅगर्स पार्क जवळील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.





२ दहशतवाद्यांचा खात्मा

मेजर राणे ४ आॅगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. पण, शहीद होण्याअगोदर त्यांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या चकमकीत त्यांच्यासोबत लष्कराचे ३ जवानही शहीद झाले.



शासकीय मानवंदना

शहीद राणे यांचं पार्थिव मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी विमानतळावर पार्थिवाचं दर्शन घेऊन राज्य शासनातर्फे पुष्पचक्र वाहून त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर शहीद राणे यांचं पार्थिव आधी मालाडच्या सेंट्रल ऑर्डनन्स डेपो आणि नंतर मीरा रोड येथील शीतल नगर या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. त्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मिरा रोडसोबतच परिसरातील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती.


साश्रू नयनांनी निरोप

लष्करी ट्रकवर फुलांनी सजविलेली शवपेटी, "कौस्तुभ राणे अमर रहे"च्या उत्स्फूर्त घोषणा आणि अत्यंत भावपूर्ण वातावरण त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. अंतयात्रा स्मशानभूमीवर पोहोचल्यावर कुटुंबिय, मित्रपरिवार सोबतच पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, वरिष्ठ लष्करी अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला.



हेही वाचा-

Live Updates : महाराष्ट्र बंद, मुंबईत ठिय्या

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशी मागे!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा