Advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशी मागे!

मराठा आंदोलन आणि सरकारी रुग्णालयातील रुग्णांचे होत असलेले हाल लक्षात घेऊन हा संप मागे घेण्यात येत असल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं.

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशी मागे!
SHARES

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला. यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच राज्य कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.


कारण काय?

सातव्या वेतन आयोगासोबतच इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. सध्या सुरू असलेलं मराठा आंदोलन धगधगत असताना त्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल झाले. त्यामुळे संप करण्याची ही योग्य वेळ आहे का? असा प्रश्न उपस्थित करत सर्वसामान्यांनी या आंदोलनावर चांगलीच टीका केली. त्यामुळे मराठा आंदोलन आणि सरकारी रुग्णालयातील रुग्णांचे होत असलेले हाल लक्षात घेऊन हा संप मागे घेण्यात येत असल्याचं संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं.


तोडगा नाहीच

संपावर तोडगा काढण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी बैठक घेतली. या बैठकीतही राज्य सरकारकडून समाधानकारक आश्वासन न मिळल्याने पदाधिकाऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मराठा आंदोलन आणि सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातल्या रुग्णांचे डाॅक्टरांविना हाल होत नसल्याने संप मागे घेतल्याचं बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद देशमुख यांनी सांगितलं.


मागण्या काय?

सातवा वेतन आयोग दिवाळीच्या सुमारास मिळावा, महागाई भत्ता थकबाकी, ५ दिवसांचा आठवडा, निवृत्तीचं वय ६० वर्षे आदी कर्मचाऱ्यांच्या मागण्या होत्या.



हेही वाचा-

Live Updates : महाराष्ट्र बंद, मुंबईत ठिय्या

महाराष्ट्र बंद, मुंबईत अनेक शाळांना सुट्टी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा