Advertisement

...येथे होतात मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार


...येथे होतात मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार
SHARES

पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरारमध्ये पालिकेच्या हद्दीत असलेली स्मशानभूमी अंधारात आहे. तेथे विद्युत दिव्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने मृतांचे नातेवाईक मोबाईलच्या उजेडात अंत्यसंस्कार करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा (पू.) येथील तुळींज परिसरात जुनी स्मशानभूमी आहे. सध्या या स्मशानभूमीत नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी येणारे नागरिक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. या ठिकाणी पाणी आणि विद्युत दिव्याची व्यवस्थाच नाही, याशिवाय बसण्याची देखील सोय नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

वसई-विरार महानगरपालिकेकडून 2016-17 च्या अर्थसंकल्पात त्या विभागाच्या विकासासाठी 10 कोटी 60 लाखांचा निधी मंजूर झाला होता. अशाच प्रकारे 2017-18 या वर्षासाठी या स्मशानभूमीसाठी 12 कोटी 5 लाख 96 हजारांचा निधी मंजूर झाला आहे. एेवढा निधी मिळूनही स्मशानभूमीत अत्यावश्यक असणारी व्यवस्था नसल्याने महापालिका या निधीचा काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय. याच संदर्भात महापालिकेचं म्हणणं आहे की, ही वनजमीन असल्याने स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी मोठी अडचण येत आहे.

पालिका असं म्हणत असली तरी रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करणाऱ्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका मोबाइलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावा लागत असल्याने पालिकेच्या या उदासीन कारभारावर नागरिकांनी चांगलाच आक्रोश व्यक्त केला आहे.

नालासोपारा पूर्व हा मोठ्या लोकसंख्येचा परिसर आहे. तेथील स्मशानभूमीच्या समस्येबाबत नागरिकांनी वेळोवेळी आवाज देखील उठवला. पण आजपर्यंत त्या स्मशानभूमीत पाणी आणि विद्यूत दिव्याची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथे अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

एच. एस. दसोनी, सामाजिक कार्यकर्ते

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा