Advertisement

Google चे CEO सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत एफआयआर

मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. एका न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी पिचाई यांच्याविरोधात कॉपी राईटच्या कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे.

Google चे CEO सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत एफआयआर
SHARES

मुंबई पोलिसांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. एका न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी पिचाई यांच्याविरोधात कॉपी राईटच्या कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. आपण बनवलेला चित्रपट यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे, अशी तक्रार भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी न्यायालयासमोर केली. त्यानंतर न्यायालयानं मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर एमआयडीसी पोलिसांनी पिचाई यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आपण 'एक हसीना थी एक दिवाना था' चित्रपटाचे कॉपीराइट कोणालाही दिलेले नाहीत. असं असूनही या चित्रपटाची गाणी आणि व्हिडीओ अनेकांनी गुगल आणि यूट्यूबवर अपलोड केले आहेत, असं सुनील दर्शन यांनी सांगितलं.

चित्रपटाची गाणी आणि व्हिडीओ अपलोड होत असतानाच यूट्यूब आणि गुगलनेही अपलोड करण्याची परवानगी दिली. यामुळे त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आणि आपलं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचं म्हटलं.

तक्रारदाराच्या तक्रारीच्या आधारे, सुंदर पिचाई यांच्याव्यतिरिक्त, गौतम आनंद (यूट्यूबचे एमडी) यांच्यासह इतर Google च्या अधिकार्‍यांवर कॉपीराइट कलम ५१, ६३ आणि ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा