मालाडच्या मढ जेट्टीत आग, ३० झोपड्या जळून खाक


SHARE

मालाडच्या मढ जेट्टी परिसरात सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. ही आग इतकी पसरली की या आगीत जवळपास ३० ते ४० झोपड्या जळून खाक झाल्या. अग्शिशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून ४ फायर इंजिन आणि ३ जेट्टीच्या मदतीने २ तासानंतर ही आग आटोक्यात आणली.


जीवितहानी नाही

स्थानिकांनी सांगितल्यानुसार, जेव्हा आग लागली त्यावेळेस सुदैवाने झोपड्यांमध्ये कुणीही नव्हतं. बहुतेक झोपड्या मच्छिमारांच्या असल्याने मच्छिमार मासेमारीसाठी बोटीवर गेले होते. परिणामी मोठी जीवितहानी टळली. परंतु झोपडीधारकांच्या मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं.

या आगीत मोबाइल टाॅवरसहित लाखो रुपयांची सामान जळून सार्वजनिक मालमत्तेचं देखील नुकसान झालं.हेही वाचा-

ठाण्यात बांबूची परांची कोसळून ७ कामगार जखमी

कपड्याचं माप घेतना महिला डॉक्टरचा विनयभंगसंबंधित विषय
ताज्या बातम्या