Advertisement

ठाण्यात बांबूची परांची कोसळून ७ कामगार जखमी


ठाण्यात बांबूची परांची कोसळून ७ कामगार जखमी
SHARES

ठाण्यातील बाळकूम पाडा परिसरातील रूणवाल गार्डन सिटी इथं रंगकामासाठी बांधलेली परांची कोसळून ७ कामगार जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १०.२० वाजण्याच्या सुमारास घटना. या घटनेत ७ कामगार जखमी झाले असून त्यातील २ कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती ठाणे अग्निशमन दलाने दिली आहे.


कुणाचा समावेश?

बाळकूम अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये मोहम्मद शेख (३०), मोहम्मद रॉयल शेख (२१), हसन अली (२४), दुलाल सिंह (३५), मनिरुद्धीन शेख (२७) यांचा समावेश असून इक्तियार मोहम्मद (२०) आणि जमाल शेख (५०), या २ कामगारांना ठाणे सिव्हिल रुग्णालयातील अतिदक्षता विभागा (आयसीयू)त दाखल करण्यात आलं आहे.


नेमकं काय झालं?

बाळकूम मधील रूणवाल गार्डन सिटी इथं इमारतीला रंग काढण्याचं आणि दुरुस्तीचं काम सुरु होतं. या कामासाठी बांबूची परांची उभारण्यात आली होती. यावेळी रंगकाम करताना अचानक बांबूची परांची तुटली आणि कामगार खाली कोसळले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनेस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. जखमींना त्वरीत ठाणे सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



हेही वाचा-

८० काेटींचा जीएसटी बुडवला, पुण्यातल्या व्यापाऱ्याला मुंबईत अटक

नोकरीचं आमिष दाखवून १२ महिलांना परदेशात वेश्या व्यवसायात ढकललं



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा