Advertisement

मुलुंडच्या अॅपेक्स रुग्णालयाला आग, एकाचा मृत्यू


मुलुंडच्या अॅपेक्स रुग्णालयाला आग, एकाचा  मृत्यू
SHARES

मुंबईच्या मुलुंड परिसरातील अॅपेक्स रुग्णालयाला सोमवारी सायंकाळी अचानक आग लागली. अॅपेक्समध्ये मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. एकीकडे वीज नाही त्यात जनरेटर जळल्याने इथल्या तीस ते चाळीस रुग्णांना इतर रुग्णालयात हलवावे लागले. काही रुग्ण व्हेंटिलेटरवर देखील होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणी त्यांनी आग विजवली. मात्र या आगीत एकाचा मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे.

हेही वाचाः- खंडित वीज पुरवठ्यामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबईच्या पूटरवठा उपनगरात सध्या कोविडसाठी अॅपेक्स हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. सोमवारी सकाळीच मुंबईचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली असताना. त्यावेळी रुग्णालय प्रशासनांनी त्यांच्याजवळ असलेल्या जनरेटरच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान सायंकाळी मुलुंडच्या अॅपेक्स या कोविड रुग्णालयात सुरू असलेल्या जनरेटरमध्ये सांयकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी तांत्रिक बिघाड झाली. त्यावेळी जनरेटरने अचानक पेट घेतला. त्यामुळे रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे या रुग्णालयात त्या वेळी ३९ कोविड रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात ३ रुग्णांची परिस्थितीही चिंताजनक होती. मात्र वेळीच त्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. माञ आगीत पांडुरंग कुलकर्णी(८२) यांचा मृत्यू झाला. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा