Advertisement

नागपूरात कोविड सेंटरला आग, चौघांचा मृत्यू

गेल्या २ आठवड्यात ४ कोव्हीड सेंटरना आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

नागपूरात कोविड सेंटरला आग, चौघांचा मृत्यू
SHARES

नागपूर शहरातील (Nagpur city) वाडी इथल्या वेल्ट्रीट कोविड केअर हॉस्पिटलला (Well Treat Covid Hospital) अचानक आग लागल्याचं समोर आलं आहे. या आगीत चार रुग्णांचा मृत्यू (4 patients died) झाला आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. साधारणत: ८.४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या (Fire brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागल्यानं रुग्णालयात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांनी पळापळ सुरू केली होती.

रुग्णालयातील सर्व रुग्णांना तातडीनं इतरत्र हलवण्यात आलं. रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. मृतकांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थली कुलिंग ऑपरेशनचं काम सुरू आहे.

रुग्णालयातील २७ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्या २७ रुग्णांच्या प्रकृतीबद्दल सध्या रुग्णालयाकडून कुठलीच माहिती देण्यात आली नाही.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील भांडूप परिसरात असलेल्या सनराइज कोविड रुग्णालयाला अचानक आग लागली होती. या आगीत १० रुग्णांनी आपले प्राण गमावले होते.

त्यानंतर मुंबईतच ४ एप्रिलला दहिसरमधील जम्बो कोव्हिड सेंटरलाही आग लागली. या सेंटरमधील 50 रुग्णांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं होतं.

६ एप्रिलला नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवडमध्ये (Chandwad) एका खासगी कोविड सेंटरला (Covid Center) भीषण आग लागली आहे. ज्या दिवशी हे कोविड सेंटर सुरू होणार होते, त्यादिवशीच सेंटर आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे.



हेही वाचा

सहप्रवाशाने सुरू केले अश्लील चाळे, महिलेची रिक्षातून उडी

व्हेंटिलेटरसाठी १५ लाखांच्या लाचेची मागणी, ठाणे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला अटक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा