Advertisement

मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये आग

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत केले.

मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये आग
SHARES

मुंबई सेंट्रल परिसरातील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानात आता पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल (mumbai central) कारशेडमधील भेल निर्मित वातानुकूलित इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट (इएमयू) रॅकच्या पॉवर कोचला आग लागली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत केले. शुक्रवारी पहाटे २.५० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि ३.१० वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविलं. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

सध्यस्थितीत लोकलनं (local) प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून, लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली लोकल सेवा पुन्हा रेल्वे प्रशासनानं सुरू केली आहे. त्यामुळं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसंच, महिला प्रवाशांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा