Advertisement

वांद्र्यांतील न्यू कांता वाडीतील इमारतीला आग, दीड वर्षांच्या मुलीचा गुदमरून मृत्यू


वांद्र्यांतील न्यू कांता वाडीतील इमारतीला आग, दीड वर्षांच्या मुलीचा गुदमरून मृत्यू
SHARES

वांद्रे पश्चिमेकडील पेरी रोडवरील न्यू कांता वाडीतील शोएब मंझिल इमारतीला सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आग लागली. शाॅर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत दीदी शंकर बहादूर धानू या दीड वर्षांच्या चिमुकलीचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर तिची मोठी बहीण उमा शंकर धानू (चार वर्षे) जखमी झाली आहे. 

उमाला नजीकच्या होली फॅमिली रूग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. तर दीदीचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी स्पष्ट केलं.

न्यू कांता वाडी येथील दोन मजली इमारतीतील पंप रूमला दुपारी १२ वाजून ११ मिनिटांनी आग लागली. शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी त्वरीत घटनास्थळी दाखल झाली.

अग्निशमन दलाला १२ वाजून ३० मिनिटांनी आग विझवण्यात यश मिळाले खरं. पण तोपर्यंत पंप रूमच्या वरच्या मजल्यावरील घरातील दीड वर्षांच्या मुलीचा गुदमरून मृत्यू झाला होता. तर तिची अडीच वर्षांची बहिण जखमी झाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा