Advertisement

कांदिवलीतील म्हाडाच्या जुन्या इमारतीला भीषण आग

कांदिवली पश्चिम येथील एकता नगर परिसरातल्या जुन्या म्हाडा इमारतीला आग लागली आहे.

कांदिवलीतील म्हाडाच्या जुन्या इमारतीला भीषण आग
(Representational Image)
SHARES

मुंबईतल्या कांदिवली परिसरातील एका इमारतीत आग लागल्याची माहिती समोर येत आहे. कांदिवली पश्चिम येथील एकता नगर परिसरातल्या जुन्या म्हाडा इमारतीला आग लागली आहे. या म्हाडाच्या १० नंबर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

इमारतीला लागलेली आग ही भीषण असून संपुर्ण पहिल्या मजल्यावर आग पसरली आहे. या आगीमुळं आजूबाजूच्या परिसरात धुरांचे लोट पसरत आहेत. शिवाय या आगीमुळं पहिल्या मजल्यावरील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसंच, श्वास घेण्यास अढथळा होत असल्यानं अनेक जण बेशुद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळं लागल्याचं समजतं. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

या दुर्घटनेत जखमी व बेशुद्ध झालेल्या नागरिकांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा