Advertisement

गिरगाव : पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग, शिवसेना कार्यकर्ता जखमी

गिरगाव येथील पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली

गिरगाव : पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग, शिवसेना कार्यकर्ता जखमी
SHARES

गिरगाव (Girgaon) येथील पुंगालिया हाऊस (Pungalia House) कंपाऊंडमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची घटना मध्यरात्री घडली. या आगीत पाच ते सहा कार आणि आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

तर या कंपाउंडमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे कपडे, प्लास्टिक आणि नायलॉनचे रोल जळून खाक झाले आहेत. तसेच बाजूच्या दोन घरांनाही आग लागली आहे. फटाक्यानं ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिवीतहानी झाली नाही पण स्थानिक शिवसेना कार्यकर्ता गाड्या ओढून काढताना भाजून किरकोळ जखमी झाला आहे. त्याला बऱ्याच गाड्या वाचवण्यात यश आलं आहे. पण स्थानिकांनी आरोप केला आहे की, अग्निशमन दलाकडे फ्लडलाईट नव्हती. आम्हीच प्लडलाईटची व्यवस्था केल्याचंही त्यानी म्हटलं आहे.

आग इतकी भीषण होती की, पाच ते सहा कारबरोबर आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तसेच तिथे राहणाऱ्या लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमाक दलाच्या जवानांनी अनेक गाड्या बाहेर काढण्यात यश मिळवलं. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमाक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे या आगीमुळं नुकसान झालं आहे.


हेही वाचा

mumbai"="" target="_blank">Mumbai local train update: मध्यरेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, प्रवासी ताटकळत">Mumbai Local Train Update: मध्यरेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, प्रवासी ताटकळत

दादर आणि गिरगाव चौपाटीनंतर आता नरिमन पॉईंट इथे व्ह्यूईंग डेक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा