वरळीतील साधना हाऊसला भीषण अाग, अग्निशमनच्या १२ गाड्या दाखल

शनिवारी सकाळी परळ येथील कमला मिल कम्पाउंड समोरील ऑर्बिट टेरेस या इमारतीला अाग लागली होती. अग्निशमने तात्काळ तिथे धाव घेत अाग विझवली. त्यानंतर काही तासातच वरळीतील साधना हाऊस या इंडस्ट्रियल इस्टेट इमारतीला भीषण अाग लागली.

SHARE

मुंबईत अागीच्या घटनांंचं सत्र सुरूच असल्याचं दिसून येत अाहे. शनिवारी संध्याकाळी वरळीतील साधना हाऊस या इमारतीला भीषण अाग लागली. अागीची माहिती मिळताच अग्निशमनच्या १२ गाड्या तात्काळ तेथे दाखल झाल्या. दोन तासानंतर अग्निशमनला अाग नियंत्रणात अाणण्यास यश अालं. सुदैवाने या अागीत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची प्राथामिक माहिती अाहे. 


शाॅर्ट सर्किटमुळे अाग 

शनिवारी सकाळी परळ येथील कमला मिल कम्पाउंड समोरील ऑर्बिट टेरेस या इमारतीला अाग लागली होती. अग्निशमने तात्काळ तिथे धाव घेत अाग विझवली. त्यानंतर काही तासातच वरळीतील साधना हाऊस या इंडस्ट्रियल इस्टेट इमारतीला भीषण अाग लागली. ही इमारत तळमजला अधिक चार मजल्यांची अाहे. तळमजल्यावर शाॅर्ट सर्किटमुळे अाग लागल्याचं कळतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट उसळल्याने अग्निनशमनच्या जवानांना अाग विझवण्यात अडचणी अाल्या.


विद्युत पुरवठा बंद 

या इमारतीत विविध कंपन्यांची कार्यालये अाहेत. रिलायन्स कंपनीचंही येथे कार्यालय असल्याचं समजतं. शनिवार असल्याने बहुतांशी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे इमारत जवळपास रिकामीच होती. जे लोक इमारतीत होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश अालं अाहे. इमारतीचा विद्युत पुरवठा बंद करण्यात अाला अाहे. 
संबंधित विषय
ताज्या बातम्या