Advertisement

केईएम आणि नायर हॉस्पिटल होणार 'फायरप्रूफ'!

या दोन्ही रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रिकल केबिन आणि इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आहे. त्यामुळे इथे एरोसोल अग्निशमन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये आगीची दुघर्टना घडल्यास या यंत्रणेद्वारे आपोआपच आग नियंत्रणात येणार आहे. शिवाय, त्याद्वारे गॅसची निर्मिती होऊन गुदमरणे किंवा कोणतीही हानी होणार नाही.

केईएम आणि नायर हॉस्पिटल होणार 'फायरप्रूफ'!
SHARES

मुंबईत सध्या आगीच्या दुघर्टना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या असून आता प्रत्येक इमारत आणि कार्यालय हे अग्निसुरक्षेच्या स्कॅनरमधून जाणार आहे. त्यामुळे परळचे केईएम रुग्णालय आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाची फायर सेफ्टी आता वाढवली जात आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रिकल केबिन आणि इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आहे. त्यामुळे इथे एरोसोल अग्निशमन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये आगीची दुघर्टना घडल्यास या यंत्रणेद्वारे आपोआपच आग नियंत्रणात येणार आहे. शिवाय, त्याद्वारे गॅसची निर्मिती होऊन गुदमरणे किंवा कोणतीही हानी होणार नाही.


शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या घटना

साकीनाका येथील भानु फरसाण आणि त्यानंतरच्या कमला मिलमधील पबला लागलेल्या आगीमध्ये एकूण २८ जणांचे बळी गेले. त्यानंतर आग लागण्याचे प्रकार सुरुच असून यातील बहुतांशी आगीच्या घटना या इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळेच घडत आहेत. त्यामुळे सर्व हॉटेल, मॉल, दुकाने, कारखाने यांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेनेही आपल्या रुग्णालयांची विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी केईएम व नायर या दोन रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार आहे.


दीड कोटींचा येणार खर्च

केईएम व नायर ही दोन्ही प्रमुख रुग्णालये असून याठिकाणी रुग्ण, त्यांचे नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो. परंतु, रुग्णालयातील बहुतांश इमारतींमध्ये मोठे इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन व इलेक्ट्रिक केबिन आहे. त्यामुळे विद्युत बिघाडामुळे लागणाऱ्या आगीपासून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अद्ययावत अग्निशमन यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये ही यंत्रणा बसवण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले जात आहेत. यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.



हेही वाचा

कमला मिल आग: अग्निशमन अधिकाऱ्यासह दोघांना अटक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा