Advertisement

शाहरुख खानच्या मन्नतजवळील इमारतीला लागलेली आग आटोक्यात, एकाचा मृत्यू

आग विझवण्याच्या प्रयत्नात 31 वर्षीय अग्निशमन कर्मचाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला.

शाहरुख खानच्या मन्नतजवळील इमारतीला लागलेली आग आटोक्यात, एकाचा मृत्यू
SHARES

मुंबईतील वांद्रे भागातील मन्नत या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या बंगल्याजवळील 21 मजली इमारतीला सोमवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. मात्र, आता ही आग आटोक्यात आली आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात एका 31 वर्षीय अग्निशमन कर्मचाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला. जीवेश असे इमारतीचे नाव असून याच इमारतीच्या 14व्या मजल्यावर आग लागली होती.

जीवेश इमारतीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. तूर्तास आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान कौशल खजानसिंग राजपूत यांचा गुदमरून मृत्यू झाला. आगीची माहिती अग्निशमन विभागाला सायंकाळी ७.४५ च्या सुमारास मिळाली. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या, सात जंबो टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या.

इमारतीतील सर्व रहिवासी सुखरूप आहेत. पण या घटनेत एका अग्निशमन दलातील जवानाचा मृत्यू झाला आहे. 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तब्बल एका तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहे. ही आग या इमारतीच्या 14 मजल्यावर लागली होती. अग्निशमन दलाचा 1 कर्मचारी आग विझवताना जखमी झाले होते.

जखमी अग्निशमन दलाच्या जवानाला जवळच भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या फायर कूलिंगचे काम सुरू आहे, मात्र ही आग कशामुळे लागली याची चौकशी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.हेही वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' उड्डाणपूल दर आठवड्याच्या शेवटी वाहतुकीसाठी बंद

मुंबईत अनेक ठिकाणी NIAची छापेमारी, दाऊदच्या संबंधितांवर कारवाई

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा