मध्य रेल्वेवर पहिल्यांदाच स्वयंचलित ई-शौचालय सुरू


SHARE

मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोइम्बतूर एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीत स्वयंचलित ई-शौचालय सुरू केलं आहे. हे ई-शौचालय प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलं आहे.
सोमवारी जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोइम्बतूर या लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीत हे ई-शौचालय कार्यान्वित केलं.


काय आहेत वैशिष्ट्ये?

  • शौचालयाचा दरवाजा उघडताच सेंसरच्या मदतीने स्वयंचलित फ्लॅशची सुविधा
  • प्रत्येकी ५ वापरानंतर शौचालयातील फ्लोरिंगची स्वयंचलित साफसफाई
  • टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले शौचालयांचं फ्लोरिंग
  • शौचकूपामधील पाण्याचा निचरा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर.
  • अन्य यंत्रणांमध्येही इलेक्ट्रॉनिक्स तंत्राचा समावेश

एक्स्प्रेसच्या डब्यातील प्रसाधनगृहात ई-प्रसाधनगृहाचा वापर ही संकल्पना थिरुवंथपुरधील 'इरम' या संस्थेने विकसित केली. या गाड्यांमधील प्रसाधनगृहात स्वच्छतेचा अभाव असतो. आता या प्रसाधनगृहाचा वापर सुरू केल्यावर त्याच्या वापराविषयी प्रवाशांची मतंही जाणून घेतली जातील. या पद्धतीत प्रसाधनगृहाचा दरवाजा उघडताच स्वयंचलित पद्धतीने पाण्याचा निचरा होऊन प्रत्येक वेळी शौचकूप स्वच्छ राहील, अशी व्यवस्था आहे.

संबंधित विषय