Advertisement

संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनात पहिला मजला उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांसाठी


संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनात पहिला मजला उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांसाठी
SHARES

शिवाजी पार्क येथे महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र कला दालनातील एक मजला चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टिपलेल्या विहंगम छायाचित्रे (एरियल फोटोग्राफ) यांच्यासाठी अडवला गेला आहे. राज्यातील गडकिल्ल्यांसह पर्यटन स्थळांचे विहंगम दृष्य यासाठी पहिल्या मजल्यावरील जागा राखीव ठेवण्यात आली असून यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सर्व छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.


'बी. जी. शिर्के'ला निविदेशिवाय काम

शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक महापालिका जलतरण तलावाशेजारी मुंबई महापालिकेच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची उभारणी सन २०१०मध्ये करण्यात आली आहे. तळघर, तळमजला आणि पहिला मजला अशा स्वरुपाच्या उभारण्यात आलेल्या या वास्तूंसाठी सुमारे २० कोटींहून अधिक रुपये खर्च केले. तरण तलावासाठी नियुक्त केलेल्या बी. जी. शिर्के या कंपनीकडून निविदा न काढता हे काम करून घेण्यात आले. त्यामुळे यासाठी कंत्राटात फेरबदल करून स्मृती दालनाचे काम करून घेण्यात आले होते.


इतिहास सांगणारं दालन

या स्मृती दालनाच्या तळघरात संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित छायाचित्रे, शिल्पचित्रे आणि माहिती फलक तर तळमजल्यावर या चळवळीत सहभागी झालेल्या नेत्यांची तैलचित्रे, महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी व माती असलेले कलश, भारतमातेची शिल्पाकृती, महाराष्ट्रातील लोककलेची शिल्पाकृती, चंद्रावरील दगड आदींची मांडणी करण्यात आली आहे.


पहिल्या मजल्यावर छायाचित्र प्रदर्शन

पहिल्या मजल्यावर महाराष्ट्रातील संस्कृती व प्राचीन शिल्पे दर्शवण्यात आली होती. परंतु, या शिल्पाबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरमधून टिपलेल्या महाराष्ट्रातील विविध गड-किल्ले, लेण्यांचे तसेच देवस्थानांसह पर्यटनस्थळांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.


स्मृतिदालन नक्की कुणासाठी

हे स्मृती दालन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील चळवळींच्या स्मृती जागवणारे असताना त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांचेही कायमस्वरुपी प्रदर्शन भरवण्यात आल्यामुळे नक्की हे स्मृतीदालन उभारण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी कुणासाठी हट्ट धरून ते बांधून घेतले आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र लढयाच्या आठवणी चिरंतन राहाव्यात म्हणून स्मृती दालनाची उभारणी केली असली, तरी याठिकाणी कुणीही येत नसून उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांनाही कुणी पाहायला जात नाही. केवळ त्यांच्या छायाचित्रांचे जतन व्हावे, म्हणून त्यांचे प्रदर्शन भरवून त्यांच्या नावाने हा पहिला मजला अडवून ठेवण्यात आल्याचे दिसून येते.



हेही वाचा

८ वर्षांनंतरही सयुंक्त महाराष्ट्र कलादालन दुर्लक्षितच!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा