मुंबईत स्वाईन फ्लूचा पहिला बळी

  Mumbai
  मुंबईत स्वाईन फ्लूचा पहिला बळी
  मुंबई  -  

  मुंबईच्या तापमानात होणाऱ्या चढ-उतारामुळे स्वाईन फ्लू या आजाराचा धोका वाढला असून, या वर्षीचा स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेला आहे. वरळी येथील एका 18 महिन्याच्या चिमुकल्याचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. भायखळ्याच्या दाऊद हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 18 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. 11 एप्रिलला या चिमुकल्याला उपचारासाठी भायखळ्यातील दाऊद रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सातत्याने ताप आणि उलटीचा त्रास होत असल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे 21 एप्रिलला त्याला नूर रूग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर 25 तारखेला महापालिकेच्या कस्तुरबा गांधी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर या बालकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण, तीन दिवसात म्हणजेच 28 एप्रिलला या बालकाचा मृत्यू झाला. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात स्वाईन फ्लूची लागण झालेले नऊ रुग्ण आढळून आले होते. हे सर्व रुग्ण दादर, परळ, लालबाग आणि भायखळा या परिसरातील होते. एप्रिलमध्ये 4 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावरून चार महिन्यात मुंबईत 13 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत.  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.