Advertisement

मासे विक्रेत्यांना तळमजल्यावर जागा द्या!

एच-पश्चिम विभागातील बाजार रोडवरील टाऊन मंडईचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकासात मासे विक्रेते आणि मांस विक्रेते यांना तळघरात अर्थात बेसमेंटमध्ये जागा दिली जाणार आहे. तळमजल्यावर भाजी मार्केट बनवून उर्वरित मजले प्रकल्प बाधितांसाठी आणि वरच्या मजल्यावर सभागृह बांधलं जाणार आहे.

मासे विक्रेत्यांना तळमजल्यावर जागा द्या!
SHARES

मुंबईतील अनेक मंडईंचा पुनर्विकास महापालिकेकडून केला जात आहे. हा पुनर्विकास करताना भूमिपूत्र मासे विक्रेत्यांना बेसमेंट अर्थात तळघरात जागा उपलब्ध करून दिली जात आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी तीव्र विरोध केला असून मंडईंच्या पुनर्विकासात मासे-मांस विक्रेत्यांना तळमजल्यावरच जागा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली.


टाऊन मंडईचा पुनर्विकास

एच-पश्चिम विभागातील बाजार रोडवरील टाऊन मंडईचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकासात मासे विक्रेते आणि मांस विक्रेते यांना तळघरात अर्थात बेसमेंटमध्ये जागा दिली जाणार आहे. तळमजल्यावर भाजी मार्केट बनवून उर्वरित मजले प्रकल्प बाधितांसाठी आणि वरच्या मजल्यावर सभागृह बांधलं जाणार आहे.



भूमिपुत्रांना न्याय द्या

याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्या राखी जाधव यांनी त्यावर तीव्र हरकत घेतली. मंडईचा पुनर्विकास जरूर व्हावा. परंतु या पुनर्विकासात भूमिपूत्र असलेल्या कोळी भगिनींना तळघरात जागा देऊन त्यांना गाडण्याचं काम महापालिकेने करू नये. यापूर्वी घटकोपरमध्ये अशाचप्रकारे महापालिकेने मंडईचं बांधकाम करून मासेविक्रेत्या कोळीणींना तळघरात जागा दिली आहे. पण या तळघरात माशांच्या पाट्या नेताना त्यांची काय अवस्था होते, हे एकदा जावून पहा, असं त्यांनी सांगितलं.


सूचनांचा विचार व्हावा

तळघरात मासे विक्रेत्यांना पाट्या नेताना होणारा त्रास आणि मासे खरेदीला येणाऱ्या ज्येष्ठांचे हाल पाहता, मासे विक्रीची व्यवस्था तळमजल्यावरच व्हावी, अशी मागणी जाधव यांनी केली. त्यामुळे मंडईंचं बांधकाम करताना सदस्यांच्या सूचनांचा विचार करून त्यानुसार कार्यवाही केली जावी, असे आदेश प्रशासनाला देत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बाजार रोडवरील महापालिका मंडईंच्या पुनर्विकासाला मंजुरी दिली.



हेही वाचा-

महापालिकेच्या मंड्यांमधील दुप्पट शुल्कवाढ तूर्तास टळली

मंडईतच होणार कचऱ्यावर प्रक्रिया



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा