Advertisement

मंडईतच होणार कचऱ्यावर प्रक्रिया

मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि दररोज निर्माण होणारा कचरा पाहता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या विविध मंड्यांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या ओला कचऱ्याची तंत्रज्ञानाच्या आधारे मंडईतच विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

मंडईतच होणार कचऱ्यावर प्रक्रिया
SHARES

महापालिकेने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती मुंबईतील गृहनिर्माण संकुलांना केली असतानाच स्वत: देखील त्यावर अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार एकूण ४ मार्केटमध्ये दरदिवशी २७.५ मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यातील दादरमधील क्रांतिसिंह नाना पाटील या एकट्या मंडईत दररोज २० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे.


कारण काय?

मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि दररोज निर्माण होणारा कचरा पाहता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या विविध मंड्यांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या ओला कचऱ्याची तंत्रज्ञानाच्या आधारे मंडईतच विल्हेवाट लावण्यात येणार आहे.


कुठल्या मंडयांचा समावेश?

यासाठी दादरमधील क्रांतीसिंह नाना पाटील मंडई, दादरमधील मीनाताई ठाकरे फूल मंडई, मालाडमधील साईनाथ मंडई, बोरीवली मंडई आदी चार मंड्यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व मंड्यांमध्ये ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर मशीनद्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी पुढील ५ वर्षांसाठी ८.५० कोटी रुपयांचं कंत्राट के. के. ब्रदर्स कंपनीला देण्यात आलं आहे.


'अशी' होणार कचऱ्यावर प्रक्रिया

संपूर्ण मंडईतील ओला कचरा महापालिकेच्यावतीने गोळा करण्यात येईल. यातील ओल्या कचऱ्याचं वर्गीकरण करून त्यांचे बारीक तुकडे करण्यात येतील. त्यातील पाण्याचे अंश कमी केल्यानंतर ऑरगॅनिक वेस्ट मशीनद्वारे त्यांचं २४ तासांमध्ये विघटन केले जाईल. या विघटन केलेल्या भागांची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्यात येईल. यातून निर्माण होणाऱ्या खताची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असेल, असं महापालिकेनं स्पष्ट केलं.



हेही वाचा-

पालिकेच्या जागेत कचरा प्रकल्प राबण्यास सोसायट्यांना परवानगी

सरकारी वसाहतीतील कचरा उचलणे बंद!

मुंबईत आणखी २० सुका कचरा वर्गीकरण केंद्र



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा