Advertisement

मुंबईत आणखी २० सुका कचरा वर्गीकरण केंद्र


मुंबईत आणखी २० सुका कचरा वर्गीकरण केंद्र
SHARES

मुंबईतील गृहनिर्माण संकुलांना ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती केल्यानंतर सुका कचऱ्याच्या विल्हेवाटीकडेही महापालिकेने विशेष लक्ष पुरवलं आहे. सध्या महापालिकेने ३४ ठिकाणी सुका कचरा वर्गीकरण केंद्र सुरु केलं असून त्यात आणखी २० केंद्रांची भर पडणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिली.


रहिवाशांमधून नाराजी

मुंबईत ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करण्याचे आदेश बजावल्यानंतरही रहिवाशांकडून कचऱ्याचं वर्गीकरण करण्यात येत नव्हता. तर दुसऱ्या बाजूला सुका कचरा सरसकट ओल्या कचऱ्यासोबतच उचलला जात असल्याने सर्वच स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अखेर महापालिका प्रशासनाने सुका कचरा वाहून नेण्यासाठी खासगी टेम्पोची सेवा सर्व प्रभागांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याला स्थायी समितीनेही मंजुरी दिली.


लवकरच निविदा

मुंबईत सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेने ३४ सुका कचरा वर्गीकरण केंद्र बनवली होती. सोबत आणखी २० केंद्र सुरु केली जातील. याबाबतची निविदा प्रक्रीया सुरु असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.


नव्याने योजना

मुंबईमध्ये सध्या सुका कचरा वाहून नेण्यासाठी ४६ वाहने होती. त्यातुलनेत वाहनांच्या संख्येतही वाढ करण्यात आलेली असून ही संख्या ९४ एवढी करण्यात आल्याचं सिंघल यांनी स्पष्ट केलं. सध्या सुरु असलेल्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानात बदल करून पुन्हा एकदा दत्तक वस्तींच्या धर्तीवर त्यात सुधारणा करून नव्याने ही योजना आणली जाईल, असंही सिंघल यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा-

आधी विकासकांच्या घरचं वीज, पाणी कापा!

'महापालिकेचा घनकचरा विभाग सर्वांत भ्रष्टाचारी'संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा