Advertisement

'या' कारणांमुळे माशांचे दर चढेच, मच्छिमार संकटात

माशांची आवक कमी झाल्यामुळे मासेविक्री करणाऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे.

'या' कारणांमुळे माशांचे दर चढेच, मच्छिमार संकटात
SHARES

यंदा एप्रिल उजाडला तरी माशांचे दर वाढतच आहेत. त्यात वेगवेगळ्या कारणांमुळे समुद्रकिनाऱ्यालगत मासे मिळेनासे झाले आहेत त्यामुळे खोल समुद्राऐवजी किनाऱ्यालगत मासेमारी करणारे मच्छीमार संकटात सापडले आहेत. माशांची आवक कमी झाल्यामुळे मासेविक्री करणाऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे.

'या' कारणांमुळे माशांचे दर वाढले

१) गेल्या काही वर्षांत समुद्रकिनाऱ्यालगत सुरू असलेल्या विविध बांधकामांचा फटका समुद्रातील जैवविविधतेला बसू लागला आहे. सध्या सुरू असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या कामामुळेही किनाऱ्यालगत मासे सापडत नाहीत.

२) पर्ससीन नौकांकडून केल्या जाणाऱ्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांनाही फटका बसत आहे, असं मुंबईतील मच्छीमारांचं म्हणणं आहे.

३) मार्च-एप्रिल दरम्यान करदी आणि ओले बोंबिल हे मासे मुबलक असतात. त्यामुळे या माशांचे वाळवणही मोठ्या प्रमाणात केले जाते. परंतु यंदा या माशांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

४) पापलेटचेही प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पापलेटचे दर वाढल्याचे मच्छीमारांनी सांगितले

मच्छिमार संकटात

घाऊक बाजारात माशांचे दर वाढले आहेत.  भाव वाढल्यामुळे ग्राहक मासे घेत नाहीत. आणलेला मालही पडून राहतो. त्यामुळे मासेविक्री करून कुटुंब चालवणाऱ्या आगरी-कोळी महिलांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

६) कोरोनामुळे मासळी बाजारापासून दुरावलेला ग्राहकवर्ग अद्याप बाजाराकडे फिरकलेला नाही. शिथिलीकरणानंतर व्यवसाय सुरू झाला, पण तोही जेमतेम. त्यात माशांची कमतरता, भाववाढ यामुळे ग्राहक मासे घेत नाहीत. 

ऑनलाइन मस्त्यखरेदीला नव्या पिढीची पसंती आहे. त्यामुळे शिथिलीकरणानंतरही माहीम, कुलाबा, शीव, धारावी, खार, मरोळ यांसह बहुतांशी मासळी बाजार ओस पडले आहेत.



हेही वाचा

मुंबईत चिकनचे दर वाढले, कारण काय?

ज्येष्ठ नागरिक, शारिरीक व्यंग असलेल्यांचे लसीकरण घरी करण्यासाठी याचिका

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा