Advertisement

राज्यातील महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत.

राज्यातील महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर
SHARES

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. राज्यातील मनपाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात गणेशोत्सावानंतर लवकरच प्रचाराचा धुरळा उडणार हे निश्चित झाले आहे. 

मुंबई, पुणे, नाशिक, पिंपर चिंचवड, नागपूरसह राज्यातील सर्वच महत्त्वाच्या महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना या प्रारूप रचनेवर हरकती आणि सूचना मांडण्याची संधी मिळेल. 

4 सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत. त्यानंतर 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडेल. सुनावणी पार पडल्यावर पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत पालिका आयुक्त नगरविकास विभागाकडे अंतिम प्रभाग रचना सादर करतील.

मुंबईसह अ, ब, क वर्गातील अनेक महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि नाशिक या महापालिकांचाही समावेश आहे. प्रारूप प्रभाग रचना ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पहिली पायरी मानली जाते.

मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आले आहेत. नवी मुंबईत 111 नगरसेवकांसाठी 28 प्रभाग, कल्याण-डोंबिवलीत 122 जागांसाठी 31 प्रभाग ठेवण्यात आले आहेत. पुण्यात 41 प्रभाग असून, त्यापैकी 40 प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय ठेवला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 32 प्रभाग आणि नाशिकमध्ये 31 प्रभाग जाहीर झाले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा शुक्रवारी जाहीर झाला. 122 सदस्य निवडीसाठी चार सदस्यांचे 29 पॅनल तर तीन सदस्यांचे दोन पॅनल असे 32 पॅनल मधून 122 प्रभागासाठी निवडणूक होणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची मुदत 2020 मध्ये संपली असून कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकल्यानं गेल्या 5 वर्षांपासून पालिकेवर आजमिती पर्यंत प्रशासकीय राजवट आहे.

यंदाची आगामी पालिका निवडणुका प्रथमच बहु सदस्यीय पॅनल पद्धतीने घेतली जाण्याची शक्यता आहे. चार प्रभागाचा एक पॅनल असल्याने सर्वच राजकीय पक्षा सह इच्यूक उमेदवारांना प्रभागाची रचना कशी असणार असून कोणकोणते चार प्रभाग एकमेकाना जोडून पॅनल तयार केला आहे.



हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेट

महामार्गावरील खड्डे बुजवल्याशिवाय... उद्धव ठाकरे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा