Advertisement

जोगेश्वरीत घर कोसळल्यानं ५ जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

घर कोसळल्यानं एका मुलासह ५ जण जखमी झाले आहेत.

जोगेश्वरीत घर कोसळल्यानं ५ जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
SHARES

गुरुवारी दुपारी जोगेश्वरी इथल्या झोपडपट्टीत तीन मजली घर कोसळलं. या अपघातात एका मुलासह पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली.

"आमचे अधिकारी कूपर रूग्णालयात गेले आहेत. चौकशीनंतर आम्ही किती जखमी झाले आहेत हे सांगू,असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.”

दरम्यान, स्थानिक रहिवासी शबीर शेख यांनी मिरर ऑनलाईनला सांगितलं की, ही घटना दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान घडली. प्रेम नगर झोपडपट्टीतील तीन मजली इमारतीचा भाग कोसळला.

या अपघातात दोन पुरुष, दोन महिला आणि एक मुलगा जखमी झाला आहे. त्यातील एका महिलेला गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. इतरांना किरकोळ जखम झाल्याचं समोर आलं आहे.



हेही वाचा

कुर्ल्यात दुमजली इमारतीचा कोपरा ढासळला

मुंबईकरांनो तयार रहा, जून महिन्यात वीजेचं बिल वाढण्याची शक्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा