Advertisement

राणीच्या बागेत फुलांची सनई, बासरी आणि गिटार

शुक्रवारी १ फेब्रुवारीपासून राणी बागेत 'संगीत वाद्य' या संकल्पेनवर आधारीत प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातू बासरी, सितार, हार्मोनियम, तबला, सनई यासारखी वाद्य पाहता येणार आहेत, पण फरक इतकीच की ही वाद्य खरीखुरी नसतील, तर ही वाद्य असतील पानाफुलांनी बनलेली.

राणीच्या बागेत फुलांची सनई, बासरी आणि गिटार
SHARES

राणी बाग म्हटलं की सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर येतात ती गोड दुडूदुडू धावणारे पेंग्विन. मग हत्ती, पाणघोडा, माकडं, मोरं, हरिण यासह अनेक पक्षी-प्राणी इथं पाहायला मिळतात. त्यामुळे लहानग्यांचा कल नेहमीच राणी बागेला भेट देण्याकडे असतो. पण या राणी बागेत पेंग्विन, हत्ती, पाणघोडा, मोराबरोबर सनई, तबला, बासरी, सितार, गिटार, हार्मोनियमही पाहायला मिळाले तर नक्कीच लहानग्यांसह पर्यटकांचा आनंद द्विगुणित होईल. तेव्हा आनंद द्विगुणित करण्यासाठी तयार मुंबईकरांनो तयार व्हा. शुक्रवारी १ फेब्रुवारीपासून राणी बागेत 'संगीत वाद्य' या संकल्पेनवर आधारीत प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातू बासरी, सितार, हार्मोनियम, तबला, सनई यासारखी वाद्य पाहता येणार आहेत, पण फरक इतकीच की ही वाद्य खरीखुरी नसतील, तर ही वाद्य असतील पानाफुलांनी बनलेली.


तीन वर्षांपासून राणीच्या बागेत प्रदर्शन

मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागातर्फे मागील तीन वर्षांपासून विविध संकल्पनांवर राणीच्या बागेत प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहेत. २०१६ मध्ये 'स्वच्छ मुंबई – सुंदर मुंबई' या संकल्पनेच्या आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या प्रदर्शनात पाना-फुलांपासून स्वच्छता विषयक साहित्य आणि वाहनांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. तर, २०१७ मध्ये लहान मुलांच्या आवडत्या कार्टुन्सच्या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसंच, गेल्यावर्षी 'जलचर' या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जलपरी, डॉल्फीन, स्टारफीश, ऑक्टोपस, कासव, बदक, मगर, खेकडा, इत्याही प्रतिकृती पाना-फुलांपासून तयार करून ठेवण्यात आल्या होत्या.



'संगीत वाद्य' संकल्पना

यंदाच्या वर्षी 'संगीत वाद्य' या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात पाना-फुलांपासून तयार केलेल्या विविध वाद्यांच्या प्रतिकृती पाहायला मिळणार आहे. तसंच, विविध वाद्यांचे आवाज अनुभवता देखील येणार आहे. त्याचप्रमाणं परदेशी भाज्यांचे रोपे व झाडे पाहायला मिळणार आहेत. तसंच या प्रदर्शनादरम्यान विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे खतं, बागकामांची अवजारे आणि बागकामाविषयक पुस्तके विक्रीकरीता ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान शुक्रवार, १ फेब्रूवारीपासून ते रविवार ३ फेब्रूवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन मुंबईकरांना विनामुल्य पाहता येणार आहे.



हेही वाचा -

एकाच वेळी जुळ्या बोगद्यातून दोन टीबीएम मशीन पडल्या बाहेर

सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी 'अशी' लढवली शक्कल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा