सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी 'अशी' लढवली शक्कल

गेल्या कित्येक दिवसांपासून साकीनाका परिसरातील एका सराईत गुन्हेगाराला, परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी साकीनाका पोलिस जंगजंग पछाडत होती. पण अखेर अंमली पदार्थ विभागाच्या पोलिसांनी युक्तीचा वापर करत अर्थात एक अनोखी शक्कल लढवत नुकतंच या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे

सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी 'अशी' लढवली शक्कल
SHARES

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं नेहमीच म्हटलं जातं. अनेकदा शक्ती न लावता केवळ युक्तीच्या बळावर अवघडात अवघड गोष्ट ही साध्य करता येते. असाच काहीचा अनुभव नुकताच अंमली पदार्थ विभागाला आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून साकीनाका परिसरातील एका सराईत गुन्हेगाराला, परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी साकीनाका पोलिस जंगजंग पछाडत होती. पण अखेर अंमली पदार्थ विभागाच्या पोलिसांनी युक्तीचा वापर करत अर्थात एक अनोखी शक्कल लढवत नुकतंच या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. गुलजार खान (२३ वर्षे) असं या सराईत गुन्हेगाराचं नाव असून नोकरी देण्याच्या नावाखाली त्याला मुलाखतीसाठी बोलवत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.


पोलिस आले की व्हायचा फरार

साकीनाकाच्या जरीमरी परिसरात गुलजार हा रहायचा. अंमली पदार्थांचे व्यसन करणारा गुलजारची परिसरात भरपूर दहशत होती. फेरीवाल्यांकडून पैसे उकळणे, धमकावणे, मारामारी या सारखे गुन्हे त्याच्या विरोधात साकीनाका पोलिस ठाण्यात नोंदवले आहेत. मात्र जेव्हा जेव्हा पोलिस त्याला शोधायला यायचे. तो फरार व्हायचा. त्याच्या गुंडप्रवृत्तीचा परिसरातील नागरिकांना त्रास व्हायचा. रोजच्या गुलजारच्या त्रासाला कंटाळून अखेर दोन नागरिकांनी पोलिस आयुक्त सुबोधकुमार जयस्वालम यांच्याकडे तक्रार करत हा प्रकार लक्षात आणून दिला.


हातीच लागत नव्हता

या प्रकरणी जयस्वाल यांनी गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्त अशुतोष ढुंबरे यांना कारवाईचे आदेश दिले. ढुंबरे यांनी तातडीने अंमली पदार्थ विभागाचे पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं. त्यानुसार अंमली पदार्थ विभागाचे पोलिस मागील काही दिवसांपासून गुलजारचा साकीनाका परिसरात शोध घेत होते. मात्र गुलजार पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अधिक तपासात गुलजार हा चालक म्हणून खासगी काम करायचा अशी माहिती पोलिसांना मिळाली.


नोकरीचं दाखवलं आमिष

त्यानुसार पोलिसांनी गुलजारला पकडण्यासाठी पवईतल्या एका उच्चभ्रूवस्तीत राहणाऱ्या वृद्ध महिलेकडे चालक हवा असल्याचं पोस्टर परिसरात लावलं. तसंच चालकाला ५० हजार रुपये पगार दिला जाईल असंही पोस्टरमध्ये नमुद केलं. हे पोस्टर पाहून अनेकजण चक्क पोलिसांकडेच मुलाखतीसाठी येऊ लागले. तर पोलिसांनी टाकलेल्या या जाळ्यात गुलजारही अडकला. एकेदिवशी गुलजारही नोकरीसाठी मुलाखत द्यायला आला नि अलगत पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात एनडीपीआरएस कायद्यांतर्गत कारवाई करत पुढे त्याचा ताबा साकीनाका पोलिसांकडे दिला आहे. तर आता साकीनाका पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.



हेही वाचा -

विमानतळ खासगीकराविरोधात लवकरच मुंबईतील ९६ टक्के विमानतळ कर्मचारी संपावर?

लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी शनिवार-रविवारी २०५ लोकल फेऱ्या रद्द



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा