एस. व्ही. रोडवरील वाहतूक कोंडी फुटणार!


SHARE

बोरिवली पश्चिमेकडील कोरा केंद्र येथे महापालिकेच्या वतीने उड्डाणपुलाचं बांधकाम केलं जाणार आहे. हा उड्डाणपूल कोरा केंद्र ते कल्पना चावला चौकपर्यंत बांधला जाणार असून यामुळे येथील एस. व्ही. मार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी फुटणार आहे.

बोरिवली येथे कांदिवलीच्या दिशेने पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे एस. व्ही. रोड आणि कोरा केंद्र जंक्शनला मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या वाहतूक कोंडीवर आता महापालिकेने उपाय शोधला असून याठिकाणी १९३ मीटर लांबीच्या पुलाची उभारणी केली जाणार आहे.

सध्याचा उड्डाणपूल एस. व्ही. रोडवरील सिग्नलला उतरतो. हाच पूल आता कोरा केंद्र ते कल्पना चावला चौकापर्यंत नेला जाणार आहे. या पुलाचं काम लवकरच हाती घेणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या पुलाची उभारणी झाल्यास एस. व्ही. मार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी फुटणार आहे. त्यामुळे गोराई, चारकोप, मालाड आदी भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांना लिंकरोडवर सहज जाता येणार असल्याचे बोलले जात आहे.हेही वाचा - 

'जेव्हीएलआर'ची वाहतूककोंडी कमी होणार, बीएमसी बांधणार नवा रस्ता


संबंधित विषय