Advertisement

'जेव्हीएलआर'ची वाहतूककोंडी कमी होणार, बीएमसी बांधणार नवा रस्ता


'जेव्हीएलआर'ची वाहतूककोंडी कमी होणार, बीएमसी बांधणार नवा रस्ता
SHARES

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) वर वाहनचालकांना सकाळ ते संध्याकाळ प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. या वाहतूककोंडीवर उतारा म्हणून मुंबई महापालिका (बीएमसी) लवकरच १.१ किमी अंतराचा रस्ता बांधणार आहे.


वेळेची बचत

हा रस्ता नवीन जोगेश्वरी उड्डाणपूल, पश्चिम ते अंधेरी, लिंक रोड यांना जोडणारा असेल. या रस्त्यामुळे अंधेरीहून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ कमी होऊन १ तासांवरून केवळ १० मिनिटांवर येईल.



किती खर्च ?

हा रस्ता बांधण्यासाठी २ कोटी रुपये खर्च येणार असून या दरम्यान लिंक रोड आणि एस. व्ही. रोडवरील अंदाजे ५०० बांधकामे स्थलांतरीत करावी लागणार आहेत.


कसा असेल रस्ता?

हा रस्ता १२० फूट रुंद आणि १.१ किमी लांब असेल. हा रस्ता प्रामुख्याने 'जेव्हीएलआर' च्या धमणीचे काम करेल. जेथे प्रचंड वाहतूककोंडी होते, अशा जोगेश्वरी उड्डणपूल आणि अंधेरी लिंक रोड दरम्यानची वाहतूककोंडी कमी करण्याचे प्रमुख काम हा रस्ता करेल.



हेही वाचा -

ज्येष्ठांच्या बस प्रवासाचा भार महापालिकेच्या खांद्यावर

एकाच तिकीटावर करा मेट्रो, मोनो अन् बसचा प्रवास



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा