Advertisement

एकाच तिकीटावर करा मेट्रो, मोनो अन् बसचा प्रवास


एकाच तिकीटावर करा मेट्रो, मोनो अन् बसचा प्रवास
SHARES

मुंबईकरांचे दिवसातील किती तरी तास प्रवासातच वाया जातात असे म्हणतात. त्यातही अनेकांना एकाच वेळी रेल्वे, बस, मोनो, मेट्रोने प्रवास करावा लागतो. अशावेळी प्रत्येक वेळी वेगळे तिकीट काढा, रांगेत उभे रहा. यात वेळ आणि ऊर्जा दोन्ही जाते. पण रेल्वे, बेस्ट बस, मोनो, मेट्रो आणि जलवाहतूक अशा सर्वच प्रवासासाठी एकच तिकीट उपलब्ध झाले तर? तर मुंबईकरांचा प्रवास खरोखर सुलभ आणि सुकर होईल. मुंबईकरांचे हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.

हो... बस, रेल्वे, मोनो, मेट्रो आणि जलवाहतुकीसाठी लवकरच एकत्रित तिकीट प्रणालीअंतर्गत एकच तिकीट प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मेट्रो-३ अंतर्गत पहिले टीबीएम मशिन भूगर्भात सोडण्याच्या कामाच्या शुभारंभाच्या वेळी दिली. त्यासाठी फोर्ड मोबिलिटी सर्व्हिसेस या कंपनीशी राज्य सरकारचा नुकताच करार झाला आहे. त्यानुसार ही कंपनी लवकरच एक अॅप तयार करणार आहे. या अॅपअंतर्गत एकत्र तिकीट प्रणाली राबवण्यात येणार आहे.

एकत्रित तिकीट प्रणाली राबवण्याची संकल्पना बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने समोर आणली. त्यानंतर त्यावर अभ्यास आणि काम सुरू होते. आता अखेर लवकरच ही एकत्रित तिकीट प्रणाली प्रत्यक्षात येणार आहे. 

फोर्डकडून अॅप तयार झाल्यानंतर या अॅपवर प्रवाशांना मोनो, मेट्रो, रेल्वे, बेस्ट बस आणि जलवाहतुकीचे एकत्रित तिकीट उपलब्ध होणार आहे. म्हणजेच या एकाच तिकीटावरून प्रवाशांना मोनो, रेल्वे, मेट्रो, बेस्ट बस आणि जलवाहतुकीतून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा देणारी ही योजना ठरणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा