SHARE

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पांर्तगत भुयारी खोदकाम करण्याकरीता वापरण्यात येणारे टीबीएम मशिन (टनेल बोअरिंग मशिन) मुंबईत दाखल झाले आहे. याआधी एक टीबीएम मशिन माहीम, नया नगर येथे दाखल झाले आहे. तर दुसरे टीबीएम मशिन नुकतेच आझाद मैदानावर दाखल झाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)ने दिली आहे. सुट्या भागात आलेल्या या टीबीएम मशिनची जोडणी करून खोदकामासाठी हे मशिन भूगर्भात सोडण्यात येणार आहे. 

'एमएमआरसी'च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिलेल्या माहितीनुसार आठवड्याभरात टीबीएम मशिन भूगर्भात सोडण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. तर आॅक्टोबरपासून भुयारी खोदकामाला सुरूवात होईल. महत्त्वाचे म्हणजे मेट्रो-३ च्या प्रकल्पातील टीबीएमद्वारे भुयारी खोदकामास सुरूवात करणे हा सर्वात महत्त्वाचा आणि अवघड टप्पा आहे. त्यामुळे टीबीएमद्वारे भुयारी खोदकामाच्या शुभारंभ हा एमएमआरसीसाठी खास असल्याने हा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्याचा विचार 'एमएमआरसी'कडून सुरू असल्याचेही भिडे यांनी सांगितले आहे.


१७ टीबीएम मशिन शिरणार मुंबईच्या पोटात

३३.५ किमीच्या मेट्रो-३ प्रकल्पांर्तगत भुयारी मार्ग खोदण्यासाठी तब्बल १७ टीबीएम मशिनची गरज लागणार आहे. त्यानुसार चीनसह अन्य देशातून १७ टीबीएम मशिन मागवण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत दोन टीबीएम मशिन मुंबईत दाखल झाले असून सर्व १७ टीबीएम फेब्रुवारीपर्यंत मुंबईत दाखल होतील, असेही भिडे यांनी स्पष्ट केले आहे.


टीबीएम मशिन म्हणजे काय

भुयारी खोदकाम करण्यासाठी वापरण्यात येणारे मशिन म्हणजे टीबीएम म्हणजे. भूगर्भात २५ मीटर खोल जाऊन हे मशिन कठीण दगड फोडण्याचे काम करते. मुंबईत दाखल झालेले दुसरे टीबीएम मशिन हे ८१७ टनाचे, तर ६.६८ मीटर व्यासाचे आहे.


भुयारी खोदकाम सुरक्षित

भुयारी खोदकामावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. दक्षिण मुंबईत जिथे भुयारी खोदकाम करण्यात येणार आहे तिथे आसपास जुन्या जीर्ण इमारती आहेत. तेव्हा याइमारतींना खोदकामामुळे धक्का पोहचण्याची, इमारती कोसळण्याची शक्यता व्यक्तकरण्यात येत आहे. हा वाद थेट न्यायालयातही गेला आहे.

असे असले तरी भिडे यांनी मात्र हे काम अत्यंत सुरक्षित असल्याचा दाव केला आहे. टीबीएम तंत्रज्ञान अत्याधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान असल्याने खोदकाम सुरक्षितपणे होईल असेही त्यांचे म्हणणे आहे. तर इमारतींसंदर्भात तपासणी करण्यात आली असून खोदाकाम सुरू असताना रहिवाशांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेणार असल्याचेही भिडे यांनी स्पष्ट केले आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या