Advertisement

'मेट्रोच्या कामांमुळेच मुंबई तुंबली' आदित्यचा 'एमएमआरसी'वर निशाणा


'मेट्रोच्या कामांमुळेच मुंबई तुंबली' आदित्यचा 'एमएमआरसी'वर निशाणा
SHARES

मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे पर्जन्यवाहिन्या तुंबून मुंबईत जलप्रकोप झाल्याचा आरोप करत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी 'एमएमआरसी'च्या आडून राज्य सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. आदित्य यांनी बुधवारी रात्री ट्विट करत मेट्रो-३ च्या कामामुळे बीकेसी आणि आसपासच्या परिसरात पाणी साचल्याचा आरोप केला आहे.



मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामामुळेच मुंबई दुसऱ्या दिवशी पूर्वपदावर आल्याचा दावा करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेला सावरून घेतले. तर त्याचवेळी मुंबई तुंबण्याची इतर काय कारणे आहेत हे सांगून आपल्याला राजकारण करायचे नाही, असे म्हणत दुसऱ्या यंत्रणांकडे बोट दाखवण्याचे टाळले.

पण युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी अखेर मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी)कडे बोट दाखवलेच. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी रात्री ट्विट करत मेट्रो-३ च्या कामामुळे बीकेसी आणि आसपासच्या परिसरात पाणी साचल्याचा आरोप करत 'एमएमआरसी'ला लक्ष्य केले आहे.


काय म्हणाले आदित्य?

बीकेसीत मेट्रो-३ कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामामुळे महापालिकेच्या पर्जन्यावाहिन्यांमध्ये डेब्रिज आणि माती गेली नि पर्जन्यावाहिन्या तुंबल्या. त्यामुळे बीकेसीतील पाण्याचा निचरा होऊ शकला आणि सर्वत्र पाणी साचले.



हे देखील वाचा -

पाणी उपसणारे पंप दिखाव्यापुरतेच सुरू, कंत्राटदाराची लबाडी उघड



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा