Advertisement

पाणी उपसणारे पंप दिखाव्यापुरतेच सुरू, कंत्राटदाराची लबाडी उघड


पाणी उपसणारे पंप दिखाव्यापुरतेच सुरू, कंत्राटदाराची लबाडी उघड
SHARES

पावसाळ्यात सखल भागात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी पंप बसवले आहेत. मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसाला सुरूवात होताच हे पंप सुरु करण्यात आले. मात्र जोरदार आवाज करणारे हे पंप पाण्याचा निचरा करण्यात सपशेल फोल ठरल्याचे दिसून आले. कंत्राटदारांनी निष्कृष्ट दर्जाचे पंप बसवून महापालिकेची फसवणूक करण्यासोबतच मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहितीही यातून पुढे आली आहे.


पंपाचा फक्त आवाज

मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत ३१० ठिकाणी पंप बसवण्यात आले. या पंपापैकी २१० पंप सुरु करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षातही हे पंप सुरू होते. पण पाण्याचा निचरा करण्याऐवजी हे पंप केवळ आवाज काढून दमत थकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.



नाना चौक परिसरातील प्रकार

नाना चौक हा परिसर सखल भाग म्हणून ओळखला जातो. परंतु क्लिव्ह लँड बंदर आणि लव्हग्रोव्ह बंदर पंम्पिंग स्टेशनमुळे या भागात पाणी तुंबण्याचे प्रकार कमी झाले आहेत. तरीही या भागात पाणी तुंबल्यास पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवलेले पंप मंगळवारी ढोपरभर पाणी साचल्यानंतर सुरू करण्यात आले. मात्र पंप सुरु असूनही येथील पाण्याचा निचरा होत नव्हता. ही बाब एकेकाळी डी विभागात अभियंते म्हणून काम करणारे काँग्रेसचे नगरसेवक नरवणकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या पंपाची पाहणी केली.


बिंग फुटले

या पाहणीत पंप केवळ आवाज करत नावापुरताच सुरू राहात असून प्रत्यक्षात त्यातून पाण्याचा निचरा होत नसल्याचे नरवणकर यांनी ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त माणिक क्षिरसागर यांच्याही लक्षात आणून दिल्यानंतर कंत्राटदारांचे बिंग फुटले.

कंत्राटदारांने निकृष्ट दर्जाचे पंप बसवून एकप्रकारे मुंबईकरांची फसवणूक केली आहे. या पंपाद्वारे पाण्याचा निचरा झाला असता तर येथील पाणी वेळीच ओसरले असते, असे नरवणकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.



हे देखील वाचा -

वरळीत पडला सगळ्यात जास्त पाऊस



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा