Advertisement

उद्धव ठाकरे म्हणाले, 'महापालिकेच्या कामामुळेच मुंबई सुरक्षित'


उद्धव ठाकरे म्हणाले, 'महापालिकेच्या कामामुळेच मुंबई सुरक्षित'
SHARES

अतिवृष्टीमुळे २९ ऑगस्टला मुंबई पूर्णपणे ठप्प झाली. पण आता सर्वच स्तरातून मुंबई महापालिकेकडे बोट दाखवले जात आहे. नालेसफाई आणि मुंबईची 'तुंबई' होणार नसल्याचा महापालिकेचा दावा खोटा असल्याचे म्हणत जोरदार टीका केली जात आहे. असे असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र मंबई महापालिकेची पाठराखण केली आहे. 



बुधवारी महापौर निवास येथे मुंबईतील धुंवाधार पावसात महापालिकेने केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत महापालिकेने नालेसफाईची कामे योग्य प्रकारे केल्यामुळेच मुंबई दुसऱ्याच दिवशी पूर्वपदावर आल्याचे सांगत ठाकरे यांनी महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. महापालिकेच्या कामावर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधत नालेसफाईच्या कामाचे राजकारण करू नका, असा इशाराही त्यांनी दिला. 


परिस्थितीला जबाबदार कोण? विचारू नका

काल मुंबई ठप्प झाली हे मी मान्य करतो, मात्र हे नैसर्गिक संकट असून या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न विचारण्याऐवजी ही परिस्थिती कशी हाताळली हे देखील महत्त्वाचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी रागावर संयम ठेवत सांगितले.  

२९ ऑगस्टची परिस्थिती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगल्याप्रकारे हाताळल्यानंतर आता महापालिका पुढील कामाला लागली आहे, अशी माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली. पावसामुळे झालेले खड्डे भरण्यासह रोगराईवर उद्भवू नये यासाठी गुरुवारपासून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


उद्धव आणि पालिका आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे -

  • मुंबईत काल ३२५ मिमी पाऊस
  • २६ ठिकाणी ५० मिमी पाऊस
  • रोगराई होऊ नये यासाठी गुरुवारपासून मुंबईत आरोग्य शिबीर
  • मुंबईकरांच्या मदतीसाठी महापौर, आमदार रस्त्यावर उतरले
  • नालेसफाईचे काम महापालिकेकडून चोख
  • निसर्गाशी एका मर्यादेपर्यंत लढू शकतो
  • मुसळधार पावसाचा अंदाज असला तरी, अतिवृष्टी होईल असे वाटले नव्हते
  • जनतेची सेवा करतो म्हणून जनतेने वारंवार आशीर्वाद दिला आहे
  • आरोप करणाऱ्यांनी मुंबईत काल काय केले? याची शहानिशा करावी
  • आरोप करणाऱ्यांना उत्तर देण्यास बांधील नाही, कालच्या घटनेचे राजकारण करण्याचा नीचपणा करणार नाही
  • कोट्यवधी रुपये योग्य पद्धतीने खर्च झाले नसते तर, मुंबईतील पाण्याचा निचराच झाला नसता
  • नालेसफाईत गलथानपणा झाला नाही
  • मी खऱ्या मुंबईकरांना बांधील, विरोधकांना नाही
  • आरोग्याची काळजी करू नका, महापालिकेने चांगले काम केले
  • मुंबईवर ९ किमी उंचीचा ढग होता, सुदैवाने ढगफुटी झाली नाही
  • मंगळवारी मुंबईत भरपूर पाऊस कोसळला, हे आजच्या मुंबईकडे पाहून वाटत नाही
  • महापालिका, बीईएसटी कर्मचारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरून जनतेची मदत करत होते



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा