Advertisement

मेट्रो-३ च्या भुयारी खोदकामाला तात्पुरती स्थगिती


मेट्रो-३ च्या भुयारी खोदकामाला तात्पुरती स्थगिती
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गांतर्गत भुयारी खोदकाम करण्याच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन आठवड्यांची तात्पुरती स्थगिती दिली आहे. भुयारी खोदकाम करताना फोर्ट परिसरातील हेरिटेज इमारतींना धोका पोहचू शकतो, असे म्हणत न्यायालयाने ही तात्पुरती स्थगिती दिली आहे. ही स्थगिती फोर्ट परिसरापुरतीच असणार आहे.

फोर्ट परिसरातील जे. एन. पेटीट ग्रंथालय आणि उद्यानाच्या परिसरात मेट्रो-३ चे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांतच या परिसरात भुयारी खोदकामाच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी टीबीएम तंत्रज्ञानाचा वापर करत भूगर्भात २५ मीटर जाऊन दगड फोडण्यात येणार आहेत. अशावेळी आसपासच्या जुन्या हेरिटेज इमारतींना धक्का पोहोचण्याची दाट शक्यता आहे. हाच मुद्दा उचलत जे. एन. पेटीट संस्थेच्या ट्रस्टींनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान शुक्रवारी दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे.


इमारतींच्या तपासणीसाठी समिती

भुयारी खोदकामाला स्थगिती दिली असली, तरी दुसरीकडे न्यायालयाने खरोखर हेरिटेज इमारतींना खरोखरच धोका पोहचणार आहे का? हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी तीन सदस्यीय समितीही नेमली आहे. ही समिती संपूर्ण दक्षिण मुंबईतील मेट्रोच्या कामाची आणि त्या कामामुळे इमारतींवर होणाऱ्या परिणामाची पाहणी करणार आहे.

उच्च न्यायालयाच्या या स्थगितीमुळे मेट्रो-३ च्या कामाला ब्रेक बसणार असल्याचे म्हटले जात आहे. पण फोर्ट वा आसपासच्या परिसरात प्रत्यक्षात भुयारी खोदकाम सुरू होण्यास अजून बराच काळ आहे. त्यामुळे सध्या तरी या स्थगितीचा कोणताही परिणाम मेट्रो-३ च्या कामावर होणार नाही. त्यामुळे यापुढील सुनावणीत उच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा