Advertisement

१५ दिवसांत तिन्ही पादचारी पुलांचं काम होईल? लष्करापुढे आव्हान


१५ दिवसांत तिन्ही पादचारी पुलांचं काम होईल? लष्करापुढे आव्हान
SHARES

एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर एकूणच रेल्वे प्रशासनाने धडा घेत प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार सुरु केला आहे. एल्फिन्स्टनसह आणखी तीन पूल नव्याने बांधण्याची घोषणाही केली. 'या तिन्ही पुलांचं काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करावं', असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हे काम लवकर व्हावं म्हणून भारतीय सैन्य दलाला या तिन्ही पुलांच्या कामाची जबाबदारी देण्यात आली. पण, आता हे काम ३१ जानेवारीपर्यंत होईल का? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, अजूनही या तिन्ही पुलांचं काम पूर्ण झालेलं नाही.

या कामाला फेब्रुवारी महिन्याचे आणखी दोन आठवडे लागतील, अशी माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे.



३१ जानेवारीपर्यंत पुलाचं काम होणार नाही?

एल्फिन्स्टन, करीरोड आणि आंबिवली या तीन स्थानकांच्या पादचारी पुलाचं सध्या काम सुरू आहे. एल्फिन्स्टन येथे दोन पूल बांधण्यात येत असून त्यातला एक पूल प्रवाशांनीच परस्पर वापरायला सुरु केला आहे. दुसऱ्या पुलाचं काम अद्याप सुरु आहे. पण, या सर्व पुलांचं काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार नाही, अशीच दाट शक्यता व्यक्त केली जातेय.


फेब्रुवारीतच तयार होणार पूल!

हे पूल ३१ जानेवारीपर्यंत प्रवाशांसाठी खुले करण्यात येतील, अशी घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली होती. पण, करीरोड आणि एल्फिन्स्ट रोड या पुलांचं दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झालं नसल्यामुळे प्रवाशांना या पुलांच्या वापरासाठी फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.



करी रोडच्या पुलाला जागेमुळे उशीर

करीरोड स्थानकातील सीएसएमटीच्या दिशेच्या पुलाचा पूर्वेकडे विस्तारकरताना मध्य रेल्वेला जागेमुळे अडचणी आल्या होत्या. पूर्वेकडील जागा मिळवण्यासाठी रेल्वेला एका महिन्याचा कालावधी लागला. त्यामुळे करीरोड स्थानकातील पादचारी पुलाच्या कामाला विलंब झाला असल्याचंही या लष्करी अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा