Advertisement

वेळेआधीच पूर्ण होईल 'एल्फिन्स्टन'चा नवा पूल! रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना विश्वास


वेळेआधीच पूर्ण होईल 'एल्फिन्स्टन'चा नवा पूल! रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना विश्वास
SHARES

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकातील फूट ओव्हर ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेनंतर एल्फिन्स्टन, करीरोड आणि आंबिवली या ३ रेल्वे स्थानकांवर तत्काळ नवे पूल बांधण्यात येत आहेत. या पुलांचं बांधकाम लष्कराकडे सोपवण्यात आलं असून हे काम ३१ जानेवारी २०१८ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. मात्र तिन्ही पुलांचं काम वेळेआधीच पूर्ण होईल, असा विश्वास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला. या पुलांच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी गोयल मुंबईत दाखल झाले असून त्यांनी सोमवारी दुपारी एल्फिन्स्टन ब्रिजची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी ४.३० वाजेदरम्यान परळ ते सीएसटी असा लोकलने प्रवास केला.


काय म्हणाले गोयल?

लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपने तिन्ही पुलांचं बांधकाम ३ महिन्यांत म्हणजे ३१ जानेवारी २०१८ अगोदर पूर्ण करण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. मात्र त्या अगोदरच पुलाचं होणं अपेक्षित आहे. एल्फिन्स्टन पुलाचं काम झाल्यानंतर लगेचच तो प्रवाशांसाठी खुला केला जाईल, अशी माहिती गोयल यांनी सोमवारी पाहणीदरम्यान दिली.

एल्फिन्स्टन रोडसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने मुंबई उपनगरीय स्थानकांवरील सर्वाधिक वर्दळीच्या सर्वच पुलांचं ऑडिट केलं. ऑडिटनंतर सुरक्षेच्या दृष्टीने एल्फिन्स्टन, करीरोड आणि आंबिवली या तीन स्टेशनवर तत्काळ पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि वेगवान कामासाठी पुलांचं काम लष्कराकडे सोपवण्यात आलं आहे.


करीरोड पुलाच्या कामाला थोडा विलंब

करी रोड इथे खासगी जागेमुळे ब्रिज बनवताना थोडा विलंब होत आहे. आंबिवलीमधील काम योग्य पद्धतीने सुरू आहे. महापालिका सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. हे तीन ब्रिज जेव्हा बनतील, तेव्हा सर्व विभागातील अधिकारी तसंच १७ झोन ऑफिसर येऊन एल्फिन्स्टन येथील कामाची पहाणी करतील. शिवाय, करीरोडच्या पुलाचं कामही वेळेत पूर्ण होईल, असं गोयल म्हणाले.


मुंबईत ३७२ एस्केलेटर बसवणार

येत्या काळात मुंबईत एस्केलेटरची संख्या वाढणार असून जवळपास ३७२ एस्केलेटर बसवणार असल्याचा प्रस्ताव असल्याचंही पियुष गोयल यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर, भारतभर एकूण ३ हजार एस्केलेटर बसवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.हेही वाचा-

एल्फिन्स्टन स्टेशनबाहेर आलं 'पोर्टेबल' तिकीट घर

परळ पुलाच्या बांधकामाचं साहित्य ठेवायचं कुठे? रेल्वे प्रशासनाला चिंता

एल्फिन्स्टन दुर्घटनेला रेल्वे सुरक्षा आयुक्तही जबाबदार!, आरटीआय कार्यकर्ते गलगली यांचा आरोपRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा