फुटपाथ नेमके कुणासाठी?


फुटपाथ नेमके कुणासाठी?
SHARES

भुलेश्वर - फुटपाथवर सर्रास होणारं अतिक्रमण पाहता मुंबईचे फुटपाथ नेमके कुणासाठी हा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडल्याशिवाय राहात नाही. भुलेश्वरमधील कबुतर गल्लीच्या नाक्यावरील फुटपाथवर लोकांनी चक्क संसार थाटल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे फुटपाथवर दिवसा हे लोक तेलाचे डबे लोकांकडून आणून स्वच्छ करण्याचं काम करतात. त्यामुळे या फुटपाथवरून जाणाऱ्यांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. अनेकदा याबाबत तक्रारी देऊनही पालिका कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तिथल्या रहिवासी आणि दुकानदारांनी केलाय. स्थानिक नगरसेवक युगंधर साळेकर यांच्याकडेही तक्रार केली, मात्र त्यांनीही दखल घेतली नसल्याचं नागरिकांनी म्हटलंय.

संबंधित विषय